Share Market : शेअर मार्केटमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टीत वाढ; अनेकजण झाले मालामाल

0
Share Market 1

Share Market : शेअरमार्केटमध्ये चढउतार सुरूच !

Share Market – लोकसभा निवडनजकीचे एक्झिट पोल अनेक जाणकार आणि वृत्तवाहिनी यांनी दिल्यानंतर देशातील शेअर मार्केटने मोठी उसळी मारली असल्याचे पाहायला मिळात आहे. शेअर मार्केटमध्ये सेन्सेक्स 2600 तर निफ्टीत 600 अंकांनी वाढ झाली आहे. त्यामुळे IPO असलेल्या कंपन्यांसह अनेकजण मालामाल झाले आहेत. शेअर बाजार आज दि. ३ जून रोजी पहिल्यांदाच उघडला. त्यानंतर बाजारात दिवाळीसारखे वातावरण निर्माण झाले आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये सुमारे ४ ते ४.४० टक्क्यांपर्यंत वाढ झाली असल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान बीएसईच्या सर्व ३० शेअर्समध्ये मोठी झाली. लार्ज कॅपमध्ये पॉवर ग्रिड (5.44%), NTPC (5.21%), M&M (5.00%), SBI (4.51%), L&T (4.38%), IndusInd Bank (4.15) अशी वाढ दिसत आहे. मिड कॅपमध्ये असलेल्या REC लिमिटेड 7.50%, श्रीराम फायनान्स 7.07%, हिंद पेट्रो 7.03%, PFC 6.78% आणि IRFC 5.65% ने वाढलेले आहेत.

स्मॉल कॅपमध्ये तर Praveg शेअर 10 टक्के, Moschip 9.98 टक्के, IRB 8.44 टक्के आणि JWL 8.43 टक्के एवढे वाढलेले आहेत. तर लार्जकॅपमध्ये MOFSL निवड हि ICICI बँक, SBI, L&T, Coal India, M&M, Adani Ports, ABB, HPCL आणि हिंदाळक अशी आहे. तसेच मिडकॅपमध्ये एमओएफएसएलची निवड हि इंडियन हॉटेल्स, गोदरेज प्रॉपर्टीज, ग्लोबल हेल्थ, केईआय इंडस्ट्रीज, पीएनबी हाउसिंग, सेलो वर्ल्ड आणि किर्लोस्कर ऑइल अशी आहे. त्यामुळे शेअर मार्केटसाठी हि आठवड्याची सुरवात अतिशय अशी दणक्यात झाली आहे. मात्र हि वाढ अशीच किती दिवस असणार याकडे गुंतवणूकदारांच्या नजरा लागलेल्या दिसत आहेत. दरम्यान गुंतवणूक करायची असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा किंवा मार्गदर्शन घ्यावे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Copyright © 2024 All rights reserved Shyadri Express | CoverNews by AF themes.