अन्नू कपूर याना जीवे मारण्याची धमकी; घेतली मुख्यामंत्र्यांची भेट !

अन्नू कपूर याना जीवे मारण्याची धमकी; घेतली मुख्यामंत्र्यांची भेट !
Annu Kapoor – बॉलिवूड अभिनेता सलमान खानला लाँरेन्स बिश्नोई गँगकडूtन जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला, तसेच त्याला अनेकदा धमक्यांचे फोन आले आहेत. त्याचप्रकारे अभिनेते अन्नु कपूर यांनाही धमकीचा फोन आला असून त्यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत त्यांनी मुख्यामंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भेट घेतली आहे.
याबाबत अन्नु कपूर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी भेट घेतली. त्यांच्याशी या विषयावर चर्चा केल्याचे म्हटले जात आहे. अन्नु कपूर यांचा “हम दो हमारे १२” हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. या सिनेमाच्या नानावरुन त्यांना धमकी देण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. सिनेमा रिलीज होण्याआधीच त्याच्या नावावरून वादंग निर्माण झाला आहे.
अन्नु कपूर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीत याविषयावर सविस्तर चर्चा झाली आहे असे म्हटले,मात्र अजून दुसरा काही विषयावर बोलणे झाले का? कि अजून काही बोलणे झाले, शिंदे याची त्यांना नेमके काय आश्वासन दिले याबाबत नेमकी माहिती मिळू शकली नाही.