केंद्रीय निवडणूक आयोगाकडून ठाकरेंवर कारवाईचे आदेश

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून ठाकरेंवर कारवाईचे आदेश
ELECTION COMMITION ON UDHAV THAKRE : शिवसेना पक्षप्रमुख (ubt) उद्धव ठाकरे यांनी आचारसंहिता भंग केल्याच्या भाजपच्या तक्रारीची केंद्रीय निवडणूक आयोगाने दाखल घेतली असून राज्य निवडणूक आयोगाला कारवाई कर्णयचे आदेश दिले आहेत. भाजप नेते आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे याप्रकरणी तक्रार केली होती, त्याची दाखल आयोगाने घेतली असून कारवाईचे आदेश दिले आहेत. भाजपचे हे कारस्थान असून ज्या ठिकाणी महाविकास आघाडीला मतं मिळण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी जाणूनबूजून मतदानाला वेळ लावला जातो आहे असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता.
भाजपच्या आशिष शेलार यांच्या तक्रारीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूकआयोगाला पत्र लिहले होते. या पत्रात राज्य निवडणूक आयोगाला नेमकं त्यादिवशी पत्रकार परिषदेत काय झाले याची माहिती मागवली होती. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने तपासणी करून पत्रकार परिषदेचा संपूर्ण मसुदा इंग्रजीत भाषांतर करून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवला होता. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने तक्रारीची दखल घेत योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आचारसंहिता भंग झाल्याप्रकरणी आता फौजदारी गुन्हा देखील नोंद केला जाण्याची शक्यता आहे. तसेच राज्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून या विषयी निर्णय घेण्यात येईल. त्यांच्याविरोधात खटला देखील दाखल होण्याची शक्यताआहे. कायद्यानुसार मतदानाच्या ४८ तास आचारसंहिता भंग होईल असे करणे गुन्हा ठरतो.