प्रफुल पटेल यांची १८० कोटींची मालमत्ता जप्ती ईडीकडून रद्द !

0
praful patel

प्रफुल पटेल यांची १८० कोटींची मालमत्ता जप्ती ईडीकडून रद्द !

PRAFUL PATEL – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांना ईडीने मोठा दिलासा दिला आहे. PMLA कायद्यांतर्गत त्यांच्या वरळी येथील त्यांच्या मालकीच्या १२ व्या आणि १५ व्या माळ्यावरील फ्लॅटची जप्ती ईडीने रद्द केली आहे. जप्त करण्यात आलेल्या सीजे हाऊस फ्लॅटची किंमत १८० कोटी रुपये होती. लोकसभा निवडणुकीनंतर आणि केंद्रात NDA सत्ता स्थापनेच्या अगदी आधी ईडीने मेहरबानी दाखवल्याने प्रफुल्ल पटेल यांच्या चेहऱ्यावर हास्य परत आले आहे असेच म्हणावे लागेल.म्हणजेच ईडीने त्यांना क्लीनचिट दिले आहे असेच आहे.

दरम्यान ईडीने २०२२ मध्ये पटेल यांच्यासह त्यांची पत्नी वर्षा आणि त्यांची कंपनी मिलेनियम डेव्हलपर्स यांच्या मालकीचे किमान सात फ्लॅट्स जप्त केले होते, गँगस्टर इक्बाल मिर्ची याच्या पत्नीकडून ही मालमत्ता पटेल यांनी बेकायदेशीररित्या खरेदी केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता.सोमवारी याबाबत ईडीने ही मालमत्ता इक्बाल मिर्चीशी संबधित नसल्याचे म्हणणे मांडले आणि जप्ती रद्द केली आहे. तयामुळे पटेल आणि कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे.

ईडीने ज्या मालमत्तेवर कारवाई केली होती. त्यात दोन मजले हे इकबाल मिर्ची याच्या कुटुंबियांचे होते. त्यांना ईडीने अगोदरच जप्त केले होते. ही मालमत्ता व्यावसायिक कामांसाठी उपयोगात होती. प्रफुल्ल पटेल यांच्यावर आरोप होता की, त्यांनी इकबाल मिर्चीशी करार करुन ही संपत्ती खरेदी केली आहे. ईडीच्या दाव्यानुसार हा करार 2007 मध्ये झाला होता. अर्थातच पटेल यांनी हा आरोप नाकारला होता. मनी लाँड्रिंगसंबंधीत या प्रकरणात ईडीने पीएमएलए कायद्यातंर्गत तपास करत होती.

तसेच या प्रकरणात ईडीने आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर 2019 मध्ये प्रफुल्ल पटेल यांची चौकशी करण्यात आली होती. मात्र मधल्या काळात राज्यात बरीचशी उलथापालथ झाली आहे, आणि आता NDA ची पुन्हा सत्ता आलीआहे. त्यामुळे आता ईडीने पटेल याना दिलासा दिला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Copyright © 2024 All rights reserved Shyadri Express | CoverNews by AF themes.