“हमारे बारह” चित्रपटावर कर्नाटक सरकारची बंदी!

"हमारे बारह" चित्रपटावर कर्नाटक सरकारची बंदी!
HAMARE BARAH MOVIE – कर्नाटक सरकारने ‘हमारे बारह’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर दोन आठवड्यांपर्यंत किंवा पुढील सूचना मिळेपर्यंत राज्यात बंदी घातली आहे. हा निर्णय कर्नाटक सिनेमा नियमन कायदा 1964, कलम 15 (1) आणि 15 (5) नुसार घेण्यात आला आहे.
दरम्यान ‘हमारे बारह’ या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर राज्यात जातीय तेढ निर्माण होईल, असा आरोप कर्नाटक सरकारने केला आहे. अनेक अल्पसंख्याक संघटना आणि शिष्टमंडलांच्या विनंतीचा विचार करून आणि चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतरच अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले आहे. अनु कपूर यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट आज दि. ७ जून रोजी देशात रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये वाढत्या लोकसंख्येचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरवरून वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटात अनु कपूर, मनोज जोशी आणि पारितोष त्रिपाठी यांच्या भूमिका आहेत.
एका विशिष्ट धार्मिक समुदायाच्या कार्यकर्त्यांनी याचिका दाखल केली आहे. त्यामुळे चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यात आले आहे. त्यामुळे हा कायदेशीर अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे चित्रपटाचे निर्माते आणि गुंतवणूक करणारे यांच्यात चिंतेचे वातावरण आहे.
त्यामुळे काही धार्मिक भावनांचा विचार करून कर्नाटक सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे.