PANKAJA MUNDE : दिल्लीत घडामोडींचा वेग : पंकजा मुंडे याना राज्यसभा आणि मंत्रिपद मिळण्याचे संकेत !

दिल्लीत घडामोडींचा वेग : पंकजा मुंडे याना राज्यसभा आणि मंत्रिपद मिळण्याचे संकेत !
PANKAJA MUNDE : लोकसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसलेल्या भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील तिसऱ्या सरकारच्या कॅबिनेटमध्ये पंकजा मुंडे यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यसभेवर पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन करुन त्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात सहभागी करुन घेतले जाईल असे म्हटले आहे. त्यांना केंद्रीय नेतृत्वाकडून दिल्लीला बोलावणे आले आहे. त्यामुळे या चर्चा सुरु झाल्या आहेत.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना दिल्लीहून बोलावने आले असल्याचे म्हटले जात आहे. पंकजा मुंडे या सकाळीच तातडीने दिल्लीला रवाना झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या पियुष गोयल, उदयनराजे भोसले, नारायण राणे यासारख्या उमेदवारांच्या राज्यसभेच्या जागा रिक्त होणार आहेत.
तसेच पंकजा मुंडेंना राज्यसभा देऊन मंत्रिमंडळात समावेश केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंकजा मुंडे यांना राज्यसभेचं सदस्यत्व मिळाल्यास बीडला दोन खासदार मिळू शकतात. दरम्यान या लोकसभा निवडणुकीत अनेक मातब्बरांचा पराभव झाला आहे.