NARENDRA MODI : मोदी यांचा ९ जून रोजी शपथविधी; संसदेत संविधानाला वंदन ! NDA ची बैठक संपन्न

NARENDRA MODI : मोदी यांचा ९ जून रोजी शपथविधी; संसदेत संविधानाला वंदन ! NDA ची बैठक संपन्न
NARENDRA MODI – देशात लोकसभेमध्ये भाजप प्रणित NDA ने बहुमत प्राप्त केले आहे. त्यांनी आता सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. नरेंद्र मोदी यांची नेतेपदी नियुक्ती केली असून ते तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. ९ जून रोजी सायंकाळी ६ वाजता हा शपधविधी होणार आहे.
दरम्यान, देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतेपदी निवडीचा प्रस्ताव ठेवला, त्याला गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी, चंद्राबाबू नायडू, कुमारस्वामी, नितीश कुमार यांनी अनुमोदन दिले. नितीश कुमार म्हणाले, आमचं मोदींना पूर्ण समर्थन आहे, लवकरात लवकर तुम्ही शपथ घ्या, आम्ही पुढचे सर्व दिवस तुमच्या सोबत आहोत. यावेळी या निवडणुकीत काही इकडे तिकडे निकाल झाला, पण पुढच्यावेळी विरोधी सर्व हरतील, असा विश्वास नितीश कुमार यांनी व्यक्त केला.
दरम्यान, भाजपच्या नेतृत्वातील एनडीएच्या घटकपक्षांची आज दि. ७ जून रोजी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बैठक झाली. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे उपस्थित होते. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना मंचावर विशेष स्थान देण्यात आले. याशिवाय बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासह NDA च्या घटक पक्षाच्या सर्व अध्यक्षांना मंचावर विशेष स्थान देण्यात आले आहे. मोदी यांचे भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी स्वागत केले. यावेळी सर्वानी मोदी यांचे तळ्याच्या गजरात स्वागत केले.
मोदीं यांचे संविधानाला वंदन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेंट्रल हॉलमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी, सर्वात आधी संविधानाच्या प्रतीवर डोके ठेवून वंदन केले. यानंतर जे पी नड्डा यांनी पुष्पगुच्छ देऊन, मोदींचं स्वागत केले. लोकसभा निवडणुकीत भाजपला 240 तर NDA ला 293 जागा मिळाल्या आहेत. देशात सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा 272 इतका आहे.
दरम्यान राजनाथ सिंह, चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार, एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी नरेंद्र मोदी यांचे स्वागत आणि अभिनंदन करून पूर्णपणे पाठिंबा असून आपण तुमच्याच सोबत असल्याचे म्हटले आहे.