शेख अल्ताफ मोहियोद्दीन राष्ट्रपती शौर्य पुरस्काराने सन्मानित

शेख अल्ताफ मोहियोद्दीन राष्ट्रपती शौर्य पुरस्काराने सन्मानित
शेवगाव (प्रतिनिधी) – पोलीस उपनिरीक्षक शेख अल्ताफ मोहियोद्दीन याना राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राष्ट्रपती शौर्य पुरस्काराणे सन्मानित करण्यात आले आहे. हा सोहळा राजभवन मुंबई येथील दरबार हॉल येथे पार पडला.
दरम्यान सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक शेख अल्ताफ मोहियोद्दीन अहमदनगर, यांना राष्ट्रपती भारत सरकार यांच्याकडून “सराहणीय सेवा मेडल” 26 जानेवारी 2022 रोजी जाहीर झाले होते. सदर राष्ट्रपती पोलीस पदक हे त्यांना दिनांक 06 जुन 2024 रोजी राज्यपाल रमेश बैस यांचे हस्ते राजभवन मुंबई येथील दरबार हॉल येथे देण्यात आले आहे. या कार्यक्रमाला अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) श्रीमती सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आदी उपस्थित होते.
अल्ताफ शेख यांना पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी केले बद्दल अद्यापपर्यंत 368 बक्षीसे मिळाली आहेत. त्यांनी कोतवाली, तोफखाना, कर्जत पोलिस स्टेशनसह स्थानिक गुन्हे शाखा, नागरी हक्क संरक्षण विभाग या ठिकाणी उत्कृष्ट सेवा केली आहे. पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांचा सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.