Gpay ची सेवा बंद; ग्राहकांमध्ये उडाला गोंधळ

Gpay ची सेवा बंद; ग्राहकांमध्ये उडाला गोंधळ
गुगलने आपले पेमेंट अँप GPay अँप बंद करण्याचा निर्णय घेतला असून अमेरिकेमध्ये याची सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. यामुळे लाखो युजर्सना मोठा फटका बसणार आहे. गुगलने ऑनलाईन पेमेंट अॅप gpay बंद केले आहे मात्र ते भारतात बंद केले नसून अमेरिकेत बंद केले आहे.
भारतातील युझरला gpay वापरता येणार आहे. याचे सेवा सुरूच राहणार आहे. परंतु हळूहळू प्रत्येक देशात हा नियम लागू केला जात आहे. सध्या अमेरिकेत Gpay पूर्ण बंद करण्यात आले आहे. त्यामुळे भारतात देखील ते बंद करण्यात येईल अशी चर्चा आता सुरु झाली आहे.
दरम्यान 4 जूनपासून प्ले स्टोरवरुन Gpay App हटवण्यात आले आहे. कंपनीने हा निर्णय गूगल वॉलेटला प्रमोट करण्यासाठी घेतला असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता Gpay ऐवजी गूगल वॉलेट वापरण्याचा सल्ला युजर्सना दिला जात आहे. गूगलने 2011 मध्ये गुगल वॉलेट लाँच केले होते.
Gpay सेवा युजर्स गुगल वॉलेटच्या माध्यमातून वापरू शकणार आहेत. भारतात देखील gpay बंद करून गुगल वॉलेट वापरण्यास प्रोत्साहन दिले जाण्याची शक्यता आहे .