जायकवाडी धरणात तब्बल 1 टक्क्याने पाणीसाठा वाढला

जायकवाडी धरणात तब्बल 1 टक्क्याने पाणीसाठा वाढला
पैठण – उन्हाळ्यात जायकवाडी धरणातील पाणीसाठा कमी झाला होता, मात्र मान्सूनचे आगमन झाल्याने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. सलग तीन दिवसं[पासून पाऊस सुरु असल्याने जायकवाडी धरणातील पाणीसाठा सुमारे १ टक्क्याने वाढला आहे. त्यामुळे धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
दरम्यान जायकवाडी धरणात पहिल्याच पावसाने पाण्याची आवक सुरू झाली आहे. पहिल्याच पावसात संभाजीनगरला महिनाभर पाणी पुरेल इतका पाणीसाठा जमा झाला आहे. जायकवाडी धरणात तब्बल 1 टक्क्याने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. जायकवाडी धरणात 4600 क्यूसेक्सने पाण्याची आवक सध्या सुरु आहे. जायकवाडी धरण भरायला सुरुवात झाल्यामुळे मराठवाड्याला दिलासा मिळाला आहे.तसेच शेवगाव -पाथर्डी तालुक्यातील अनेक गावांची तहान देखील जायकवाडी धरणामुळेच भागते.