विधान परिषदेत महायुतिकच्या उमेदवाराला विजयी करा : मंत्री विखे पाटील

0
Vidhan Parishad Baithak

विधान परिषदेत महायुतिकच्या उमेदवाराला विजयी करा : मंत्री विखे पाटील

अहमदनगर (प्रतिनिधी) – नकारात्मक प्रचारातून महाविकास आघाडीला मिळालेले यश फार टिकणारे नाही. विरोधकांच्या नॅरेटिव्हला उतर देण्यासाठी विधानपरिषद निवडणुक ही संधी आहे. नगर जिल्ह्यातील मत ही निर्णायक ठरणार असल्याने महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्या विजयासाठी कटिबध्द व्हा, असे आवाहन महसूल तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

विधानपरीषदेचे महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्या निवठणूक प्रचारार्थ आयोजित केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते.जेष्ठ नेते खिलारी गुरूजी उमेदवार किशोर दराडे, शिवाजीराव कर्डीले ,भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग विठ्ठलराव लंघे प्रा.भानूदास बेरड, सुनिल पंडीत, अभय आगरकर नितीन दिनकर, बाबुशेठ टायरवाले, मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे रासपच्या जिल्हाध्यक्षा सुवर्णा जर्हाड लहूजी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल शिंदे मुख्याध्यापक संघाचे संभाजी पवार यांच्यासह शिक्षक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

आपल्या भाषणात ना.विखे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत शिर्डी आणि अहील्यानगर या दोन्ही मतदार संघात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परीश्रमाबद्दल आभार मानले.राजकारणात जय पराजय होत असतात.पण यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने अतिशय नियोजनबध्द पध्दतीने नकारात्मक प्रचार केला.यामध्ये संविधान बदलापासून ते अल्पसंख्याक समाजाची दिशाभूल करण्यात आली.यामध्ये मराठा आरक्षाचा मुद्दा होता.विकासाच्या मुद्दयावरून निवडणूक दूर नेण्यात महाविकास आघाडीला यश आले असले तरी हे वातावरण फार काळ टिकणारे नाही असा दावा मंत्री विखे पाटील यानी केला.

केंद्रात आणि राज्यात युतीचे सरकार आहे.नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी यशस्वी करण्यासाठी वरीष्ठ सभागृहात आपल्या हक्काची माणस असणे गरजेचे असल्याने अहील्यानगर मधील १७हजार मत निर्णायक ठरविण्यासाठी सर्वानी तालुका .स्तरावर नियोजन करण्याबाबतही सूचना देखील ना. विखे पाटील यांनी केल्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Copyright © 2024 All rights reserved Shyadri Express | CoverNews by AF themes.