सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी : ८ व्या वेतन आयोगाचा प्रस्ताव सादर…

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी : ८ व्या वेतन आयोगाचा प्रस्ताव सादर…
8th Pay Commission 2024 : सरकारी कर्मचारी ८ वा वेतन आयोग कधी लागू होणार याची मोट्या आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र आता त्यांच्यासाठी आनंदाची बातमी असून यावर्षीच्या अर्थसंकल्पापूर्वी केंद्र सरकारला आठव्या वेतन आयोगाचा प्रस्ताव प्राप्त झाला असून वेतन आयोग केंद्रीय कर्मचाऱ्यांचा आढावा घेणार आहे. ८ व्या वेतन आयोगामध्ये मूळ वेतन, भत्ते, पेन्शन यांचा समावेश आहे. दरम्यान यावर चर्चा होऊन अर्थसंकल्पमध्ये यांची घोषणा होण्याची शक्यता आहे. याचा केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा फायदा होणार आहे. वेतन आयोग हा साधारणतः दर १० वर्षांनी लागू केला जातो.
प्रस्ताव केंद्राकडे
राष्ट्रीय परिषदेचे कर्मचारी सचिव शिव गोपाल मिश्रा यांनी कॅबिनेट सचिवांना पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी ८ वा वेतन आयोग स्थापन करण्याची मागणी केली आहे. तसेच २०२३ पर्यंत कशा पद्धतीने महागाई वाढत आहे याबद्दल यामध्ये समाविष्ठ करण्यात आले आहे. तसेच पूर्वी महागाई भत्ता हा ४६ टक्के होता तर आता यामध्ये ५० टक्के करण्यात आला आहे. या वेतन आयोगाचा सुमारे 1 कोटीहून अधिक कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. मात्र या वेतन आयोगावर अद्याप चर्चा झालेली नाही, परंतु लवकरच चर्चा होऊन ८ वा वेतन आयोग लागू केला जाणार जाईल.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये वाढ करण्यात यावा, पगार स्ट्रक्चरमध्ये बदल करावा असे श्री. मिश्रा यांनी म्हटले आहे. १ जानेवारी २०२४ पासून पेन्शनधारकांचा डीए ५०% असेल. मात्र यामध्ये १ जानेवारी २००४ नंतर भरती झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.