जीप इंडिया ग्राहकांसाठी देतेय खास ऑफर्स… तब्बल १२ लाख रुपयांपर्यंत होतोय फायदा…

जीप इंडिया ग्राहकांसाठी देतेय खास ऑफर्स… तब्बल १२ लाख रुपयांपर्यंत होतोय फायदा…
JEEP INDIA – देशातील विविध वाहन कंपन्या सध्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर देत असतात. तसेच सण-उत्सवांत देखील भरगोस सूट दिली जाते. त्यामुळे मोठ्याप्रमाणावर ग्राहक वाहन खरेदीसाठी पुढे सरसावत असतो. सध्या जीप इंडिया या वाहन कंपनीने ग्राहकांसाठी खास ऑफर योजना घोषित केली आहे. जीप कंपास, जीप मेरिडियन, जीप चेरोकी या मॉडेल्सवर ग्राहकांना भरघोस डिस्काउंट दिला जात आहे. ज्याचा फायदा ग्राहकांना होत आहे. मात्र याचा फायदा फक्त जून महिन्यापुरताच मिळणार आहे.
जीप कंपासवर 30 हजार, मेरिडियनवर 50 हजार, जीप इंडिया ग्रँड चेरोकी या गाडीवर तब्बल 12 लाख रुपयांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारे डिस्काउंट दिले जात आहेत. जीप इंडियाच्या ग्रँड चेरोकी, मेरीडियन, कंपास आणि रँग्लर या चार गाड्या सध्या भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
ग्रँड चेरोकीची स्पेशल एक्स शोरूम किंमत 68.50 लाख रुपयांपासून सुरू होते. मेरिडियनची एक्स शोरूम किंमत 29.49 लाख रुपये, तर जीप कंपासची एक्स शोरूम किंमत 18.99 लाख रुपयांपासून सुरू होते. रँग्लरची एक्स शोरूम किंमत 67.65 लाख रुपयांपासून सुरू होते. त्यामुळे ग्राहकांचा ओढा याकडे वाढल्याचे दिसत आहे. या सर्व ऑफरच्या माहितीसाठी जवळच्या डिलरशी संपर्क साधू शकता.