GST Council Meeting 2024 : दूध, इलेक्ट्रिक कार, रेल्वे सेवांसह या गोष्टी होणार स्वस्त

GST Council Meeting 2024 : दूध, इलेक्ट्रिक कार, रेल्वे सेवांसह या गोष्टी होणार स्वस्त
GST MEETING 2024 – देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपसथीतीतमध्ये ५३ व्या जीएसटी परिषदेची बैठक पार पडली. यामध्ये रेल्वेच्या अनेक सेवांना जीएसटीच्या कक्षेतून वगळण्यात आले आहे, तसेच दुधाच्या पावडरसह अनेक वस्तूंच्या किमती कमी होणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.
दरम्यान रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट जीएसटीच्या कक्षेबाहेर ठेवण्याची शिफारस बैठकीत करण्यात आली. रिटायरिंग रूम, वेटिंग रूम सुविधा, प्लॅटफॉर्म तिकिटांसह बॅटरीवर चालणाऱ्या कार सेवांना जीएसटीच्या कक्षेबाहेर ठेवण्याची शिफारस करण्यात आली होती. अर्थमंत्र्यांच्या मंजुरीनंतर आता रेल्वेच्या या सेवा पुन्हा एकदा स्वस्त होणार आहेत.
तसेच दुधाचे कॅन, सोलर कुकर, कागदापासून बनवलेल्या कार्टन आणि पेपर बोर्ड, फायर स्प्रिंकलरसह सर्व प्रकारच्या स्प्रिंकलरवर आता १२ टक्के जीएसटीच्या कक्षेत आणण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे या वस्तूंवर १२ टक्के जीएसटी लागणार आहे. तसेच बनावट इनव्हॉइसद्वारे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटला आळा घालण्यासाठी देशभरात आधार आधारित बायोमेट्रिक पद्धत आणली जाणार आहे.
शैक्षणिक संस्थांच्या बाहेर वसतिगृहांसारख्या सुविधा देण्यावर प्रति व्यक्ती २०००० रुपये प्रति महिना सूट देण्याची शिफारस करण्यात आली आहे. GST परिषदेने कर अधिकाऱ्यांच्या वतीने अपील न्यायाधिकरणासमोर अपील दाखल करण्यासाठी २० लाख रुपयांच्या मर्यादेची शिफारस केली आहे. यामध्ये उच्च न्यायालयासाठी १ कोटी आणि सर्वोच्च न्यायालयासाठी २ कोटी रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
GST कौन्सिलच्या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय
जीएसटी परिषदेने दुधाच्या कॅनवर एकसमान १२ टक्के कर लावण्याची शिफारस केली आहे.
कौन्सिलने फायर स्प्रिंकलरसह सर्व प्रकारच्या स्प्रिंकलरवर १२% कर लावण्याची शिफारस
सर्व प्रकारच्या सोलर कुकरवर १२% जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सर्व कार्टन बॉक्सवर १२% GST.
रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट, बॅटरीवर चालणारी वाहने आणि इंट्रा-रेल्वे सेवा जीएसटीच्या बाहेर ठेवण्याचा निर्णय.