एनटीएच्या महासंचालकपदी प्रदीप सिंह यांची नियुक्ती

एनटीएच्या महासंचालकपदी प्रदीप सिंह यांची नियुक्ती
NEET 2024 – NEET आणि युजीसी नेट पेपर लीक प्रकरणातील वादादरम्यान केंद्र सरकरने नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे महासंचालक सुबोध कुमार यांना पदावरून हटवले असून त्यांच्या जागी आयएएस प्रदीप सिंह खरोला यांची एनटीएच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान प्रदीप सिंह खरोला यांच्यावर एनटीएच्या महासंचालकपदी अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे. याशिवाय त्यांच्यावर भारत व्यापार संवर्धन संघटनेचे अध्यक्षपद आणि एमडीची जबाबदारी देखील आहे. हे प्रकरण नयप्रविष्ठ आहे, त्यामुळे ते हे सर्व कशापद्धतीने हॅण्डल करतात ते पाहावे लागणार आहे.