शेतमजुरांच्या मुलाशी लग्न करणाऱ्या मुलीला ५ लाख द्यावे ; राजू शेट्टी यांची सरकारकडे मागणी

शेतमजुरांच्या मुलाशी लग्न करणाऱ्या मुलीला ५ लाख द्यावे ; राजू शेट्टी यांची सरकारकडे मागणी
RAJU Shetti speak on Merrage : राज्यातील बेरोजगार, शेतकरी, मजूर यांच्या मुलांची लग्न होत नाहीत त्यामुळे 35 वर्षांच्या पुढे जे मुले आहेत त्यांच्याशी लग्न करणाऱ्या मुलीच्या खात्यावर 5 लाख रुपये सरकारने द्यावेत, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. बारामती येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा दोन दिवसीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत हि मागणी माजी खा. राजू शेट्टी यांनी सरकारकडे केली आहे.
दरम्यान या दोन दिवस बैटाकीमध्ये सुमरे 15 ठराव मंजूर केले. 1 जुलैपासून कर्जमुक्त अभियान करतो आहोत. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं ही आमची मागणी आहे. सरकारच्या धोरणामुळे आत्महत्या वाढल्या म्हणून कर्जमुक्त करावे. वीज वापरली नसताना बिले लादली आहेत, दुधाचे दर कमी होऊ लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान द्यावं. यावेळी 10 जुलैला चक्काजाम आंदोलन करणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.