लंके यांची इंग्रजीतून शपथ; विखे याना उत्तर दिल्याची चर्चा !, पवारांचं सूचक वक्तव्य…

लंके यांची इंग्रजीतून शपथ; विखे याना उत्तर दिल्याची चर्चा !, पवारांचं सूचक वक्तव्य…
दिल्ली – लोकसभा निवडणुकीत विजयानंतर आज दि. २५ जून रोजी १८ व्या संसदेच्या सदस्यांनी शपथविधी सोहळा पार पडला. कोणी इंग्रजी, मराठी तर कोणी हिंदी भाषेत शपथ घेतली. राष्ट्रवादी (sp) पक्षाचे नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे खा. निलेश लंके यांनी मात्र इंग्रजी भाषेत शपत घेत, माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील याना उत्तर दिले असल्याची चर्चा जिल्ह्यासह राज्यात होत आहे. मात्र लंके यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
विखे याना उत्तर?
दरम्यान माजी खा. डॉ. सुजय विखे यांनी आव्हान दिल्यानंतर निलेश लंके यांनी त्यांना उत्तर देण्यासाठी इंग्रजीतून शपथ घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यावर निलेश लंके यांनी एक वृत्तवाहिनीशी बोलताना उत्तर दिले आहे कि. त्यांना उत्तर दिलं असं म्हणता येणार नाही. पण इंग्रजी बोलणं माझ्यासाठी अवघड नव्हतं, असे निलेश लंके यांनी म्हटले आहे.
जनतेचा विश्वास सार्थ ठरवणार : लंके
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून आज इंग्रजी भाषेत शपथ घेतली. हा क्षण अतिशय जबाबदारीचा आहे याची मला जाणिव आहे. माझ्या मतदारसंघातील जनतेप्रती असणारे कर्तव्य पुर्ण निष्ठा आणि समर्पण वृत्तीने पार पाडण्याचा हा संकल्प आहे. जनतेने माझ्यावर जो विश्वास टाकला तो सार्थ ठरविण्यासाठी मी सदैव कार्यरत आहे.
लांकेनी विरोधकांना व्यवस्थित उत्तर दिले आहे : पवार
“निलेश लंके यांनी इंग्रजीतून शपथ घेतली ही चांगली गोष्ट आहे. संसेदत मराठीच काय कोणत्याही भाषेत बोलता येते. तिथे प्रत्येक भाषेचे भाषांतर केलं जातं. त्यामुळे एखादी जनमाणसांत काम करणारी व्यक्ती देशाच्या संसदेत जात असेल तर तिच्या भाषेवरून प्रश्न उपस्थित करणे हे शहाणपणाचे लक्षण नाही. निलेश लंकेंनी त्यांना व्यवस्थित उत्तर दिलं आहे, त्याचा आम्हाला आनंद आहे”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस (sp) पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी दिली.