फिरायला जाताय… भारतातील सर्वात उंच धबधबा…. वजराई तुमची वाट पाहतोय…

फिरायला जाताय… भारतातील सर्वात उंच धबधबा…. वजराई तुमची वाट पाहतोय…
vajrai waterfall – पावसाळा सुरु झाला कि, तरुणाई तसेच फॅमिली सहल काढली जाते. त्यासाठी निसर्गरम्य अशा ठिकाणांचा शोध घेतला जातो. यावर्षीच्या पावसाळ्यात फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर सातारा जिल्यात तुमच्यासाठी निसर्गाच्या कुशीत वसलेला आणि १२ हि महिने हिरवळीने भरलेला असा भारतातील सर्वात उंच असा वज्राची धबधबा आहे. हि ट्रिप तुमची यादगार झाल्याशिवाय राहणार नाही… विचार करा आणि आजच निर्णय घेऊन सहलीला निघा…
भांबवली वजराई धबधबा हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. या धबधब्याची उंची सुमारे 1840 फूट (560 मी) इतकी आहे. त्याचे पाणी साधारणतः तीन पायऱ्या (टप्प्यात) असलेल्या एका सरळ कड्यावरून खाली पडते. सर्वात उंचीवरून 3 टप्प्यांत कोसळणारा धबधबा अशी त्याची जगभरात ओळख आहे. ते पाहताना आणि शुभ्र पाणी, हिरवी झाडी, जंगल आणि पशु-पक्षी यांची आवाज व किलबिलाट यांच्या मोहात सर्व विसरून सर्वाना आपल्या ट्रेकिंगची, सहलीची चांगली मज्जा घेता येते.

दरम्यान या धबधब्याचे पाणी उरमोडी नदीतून येते. हे उरमोडी नदीचे उगमस्थान आहे. हा धबधबा पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात आहे. हे सुप्रसिद्ध कास फ्लॉवर व्हॅलीपासून सुमारे 5 किमी आणि भांबवली फ्लॉवर व्हॅलीपासून 2 किमी अंतरावर आहे. तर सातारा शहरापासून सुमारे २७ किमी आहे. हिरवेगार पर्वत, वनराई, आणि जवळच्या फ्लॉवर व्हॅलीतील फुले यांचा गंध सहलीकरांना प्रसन्न करतात. आल्हाददायक हवामान तुम्हाला कोणत्याही गोष्टीप्रमाणे आराम देते. या ठिकाणी शांतता अनुभवायास मिळते. हा धबधबा १२ हि महिने वाहतो त्यांमुळे निसर्गातील थंड आणि प्रसन्न वातावरण कायम राहते.
त्यामुळे, हे सर्व वयोगटांसाठी एक परिपूर्ण वीकेंड डेस्टिनेशन आहे. येथे आल्यानंतर हिरवाईचा आनंद, रेशमी धान्याच्या शेतात स्वादिष्ट महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ, जेवण देखील येथे मिळते. येथील वातावरणामध्ये सर्व मानसिकरित्या टेन्शनफ्री होऊन जाल. आता पावसाळा सुरु झाल्याने महाराष्ट्रासह देशातील अनेक भागातील पर्यटक येथे सहलीसाठी, ट्रेकिंगसाठी येत असतात. येथे येऊन परिपूर्ण उत्साह आणि आनंद होतो. सातारा जिल्ह्यात अजूनही काही डेस्टिनेशन आहेत. त्याचा देखील तुम्ही शोध घेऊन सहलीमध्ये समाविष्ट करू शकता.