राहुल गांधी यांची विरोधीपक्ष नेतेपदी निवड

राहुल गांधी यांची विरोधीपक्ष नेतेपदी निवड
नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत यावर्षी काँग्रेसला जवळपास १०० जागा मिळाल्या आहेत. आज दि. २६ जून रोजी लोकसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली. तसेच काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली.
दरम्यान राहुल गांधी यांच्या अगोदर त्यांच्या आई, राज्यसभा खासदार सोनिया गांधी, वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनीही विरोधी पक्षाचे नेते पद भूषविलेले आहे. विरोधी पक्षनेतेपद दहा वर्षांनंतर विरोधी पक्षाकडे आले आहे. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला एकूण जागांपैकी दहा टक्केही जागा मिळाल्या नव्हत्या. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद अस्तित्वात आले नव्हते. मात्र आता हे पद राहुल गांधी याना मिळाले आहे. त्यांना हे पद देण्यामागे काँग्रेसची रणनीती असण्याची शक्यता आहे. तसेच ते चांगल्या प्रकारे या पदाला न्याय देवू शकतील असे काँग्रेस पक्षातील अनेक नेत्यांचे आहे. राहुल गांधी यांचे सर्वानी या निवडीबद्दल अभिनंदन केले.