सरकार घर खरेदीसाठी नवीन योजना लागू करणार; अर्थसंकल्पात घोषणेची शक्यता

सरकार घर खरेदीसाठी नवीन योजना लागू करणार; अर्थसंकल्पात घोषणेची शक्यता
BUDGET 2024 – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतल्यानंतर NDA आघाडी सरकार झपाट्याने निर्णय घेत आहे. आता लोकसभा अधिवेशनात २२ जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प सादर करणार आहेत, असे समजतेय. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केंद्र सरकार घर खरेदीदारांना मोठं गिफ्ट देण्याची शक्यता आहे. सरकार यावेळच्या अर्थसंकल्पात घर निर्मितीसाठी नवीन गृहनिर्माण योजना (हौसिंग scheme) लागू करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा कोट्यवधी नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे.
दरम्यान पूर्वी घर खरेदी, घर बांधणी करणाऱ्यांसाठी पंतप्रधान दिवस योजनेच्या माध्यमातून सबसिडी देत होते. मात्र हि स्कीम बंद होती. आता मात्र या अर्थसंकल्पातून पुन्हा एकदा घर विकत घेणार्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सरकार गृहनिर्मितीसाठी अर्थसंकल्पात नवी योजना जाहीर करण्याची शक्यता आहे. तसेच गृहकर्जावरील व्याजात सूट मिळू शकते.
सरकारच्या नव्या योजनेत ५० लाखांपर्यंतच्या घरावरील व्याजावर सहाय्य देण्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. यापूर्वी १८ लाख रुपयांपर्यंतच्या घर खरेदीच्या व्याजावर सहाय्य दिले जात होते. जर हा निर्णय झाला तर अनेकांना याचा फायदा होऊ शकतो. यापूर्वी शहरी आणि ग्रामीण अशी दोन प्रकारे घर खरेदी करणाऱ्याना लाभ दिला जात असे. मात्र आता या नवीन योजनेत नेमके काय बदल होतात हे पाहावे लागेल.