ओम बिर्ला यांची दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्षपदी निवड

ओम बिर्ला यांची दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्षपदी निवड
नवी दिल्ली – लोकसभेच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा ओम बिर्ला यांची निवड झाली आहे. त्यांची निवड झाल्यानंतर खासदारांनी त्यांना भेटून अभिनंदन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएकडून ओम बिर्ला यांचं नाव अध्यक्षपदासाठी दिलं होतं. एनडीएमधील सर्व घटक पक्षांनी त्यांच्या नावाला पाठिंबा दिला. त्यानंतर आवाजी मतदानाने त्यांची या पदासाठी निवड झाली. शिवसेना (यूबीटी) खासदार अरविंद सावंत यांनी काँग्रेस खासदार के. सुरेश यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड करण्यासाठी प्रस्ताव मांडला. के. सुरेश हे सलग ८ वेळा खासदार राहिले आहेत.
दरम्यान १८ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर भाजप खासदार ओम बिर्ला लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू हेही त्यांच्यासोबत सीटवर पोहोचले होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन करून ” येत्या 5 वर्षात तुम्ही आम्हाला मार्गदर्शन कराल असा आम्हा सर्वांना विश्वास आहे.” अशा विश्वास व्यक्त केला. तसेच विरोधी आणि सत्ताधारी मंत्री, खासदार यांनी त्यांचे अभिनंदन केले.