RADHAKRISHNA VIKHE : शेती महामंडळाची जागा प्रकल्प, घरकुलांसाठी ?

शेती महामंडळाची जागा प्रकल्प, घरकुलांसाठी ?
MUMBAI – शेती महामंडळाच्या जागांचा शासकीय प्रकल्प आणि राज्य आणि केंद्र सरकारच्या घरकुल योजनेसाठी जमीन देण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक उपमुख्यमंत्री यांच्या दालनात पार पडली.
यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार रामराजे निंबाळकर, आमदार दत्तात्रेय भरणे, आमदार दीपक चव्हाण यांच्यासह अपर मुख्य सचिव महसूल राजेशकुमार, अपर मुख्य सचिव नियोजन विभाग, अपर मुख्य सचिव वित्त विभाग, प्रधान सचिव पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, सदस्य सचिव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, आणि कार्यकारी संचालक शेती महामंडळ उपस्थित होते.
राज्यातील शेती महामंडळाच्या विविध ठिकाणी जागा आहेत, या जमिनीवर शासनाचे काही प्रकल्प आणि राज्य आणि केंद्र सरकार यांच्या घरकुल योजनेसाठी पात्र लाभधारकांना जमिनी म्हणजेच जागा उपलबध करून देण्यासाठी साठी आणि विविध प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे अनेक प्रकल्पना जागा मिळणार आहे. तसेच घरकुलांचे जागा मिळून प्रश्न सुटतील.