Ashadhi wari : आषाढी वारीतील वाहनं आणि बसेसना टोल फ्री !

Ashadhi wari : आषाढी वारीतील वाहनं आणि बसेसना टोल फ्री !
राज्यातील विविध ठिकाणाहून दिंड्या, भाविक भक्त पांडुरंगाच्या जयघोषात पंढरीच्यादिशेने (pandharpur) टाळ-मृदुंगाचा गजर करत, मुखी हरीनाम जपत निघाल्या आहेत. एसटी महामंडळानेही हजारो बस पंढरीच्या वारीसाठी सोडल्या आहेत. वारकरी, भाविक भक्त मोठ्या संख्येने चंद्रभागेच्या तिरी आषाढी वारीच्या (ashadhi wari) निमित्ताने जमतात. मागीलवर्षीप्रमाणे राज्य सरकारने याहीवर्षी आषाढी वारीसाठी येणाऱ्या-जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी (tole free) देण्यात आली आहे. तसेच महामंडळाच्या एसटी बस याना देखील टोलमाफी देण्यात अली आहे. आज दि. 3 जुलै ते 21 जुलैपर्यंत ही टोलमाफी असणार आहे.
दरम्यान कोकणात गणपती उत्सवात ज्याप्रमाणे टोल माफी (tole free) दिली जाते, त्याचप्रमाणे मुख्यामंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरला (pandharpur) आषाढी कार्तिकी (ashadhi wari) निमित्त जाणाऱ्या व परत येणाऱ्या पालख्या आणि वाहनांना पथ करातून सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. वारीत सहभागी असलेल्या वारकऱ्यांच्या वाहनांसाठी परिवहन विभागातून आवश्यक स्टीकर्स दिले जाणार आहेत. विशेष म्हणजे 3 जुलै ते 21 जुलै या कालावधीत पंढरपूरला जाणाऱ्या आणि पंढरपूरहून गावी जाणाऱ्या सर्वच वाहनांना ही सवलत दिली जाणार आहे. मात्र यासाठी परिवहन विभागातून स्टिकर्स घ्यावे लागेल. दरम्यान, गरज पडल्यास सुरक्षित व सुरळीत वाहतूकीसाठी वारीतील वाहने सोडून अवजड वाहनांना वारी मार्गावर बंदी घालण्याच्या सूचनाही देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.