दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षा १६ जुलैपासून सुरु होणार

0
re- Exam

दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षा १६ जुलैपासून सुरु होणार

Re-Exam – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षा 16 जुलैपासून सुरू होणार आहेत. या परीक्षांसाठीचे प्रवेशपत्र उद्या दि. 4 जुलैपासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कोणतेही शुल्क न घेता प्रवेशपत्राची मुद्रित प्रत विद्यार्थ्यांना देण्याची सूचना राज्य मंडळाचे प्रभारी सचिव शैलेंद्र पाटील यांनी दिली आहे.

दरम्यान जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेची प्रवेशपत्रे सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी मुद्रित करून विद्यार्थ्यांना द्यायची आहेत. प्रवेशपत्राची मुद्रित प्रत देण्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क न घेण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या नियमांचे पालन करत प्रवेशपत्र आता द्यावे लागणार आहेत. परीक्षा देणाऱ्या विद्यार्त्यानी देखील वेळेत हे घेऊन परीक्षा द्यावी.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Copyright © 2024 All rights reserved Shyadri Express | CoverNews by AF themes.