ITR फॉर्ममध्ये महत्वाचे बदल; जाणून घ्या काय झालेत बदल…

ITR फॉर्ममध्ये महत्वाचे बदल; जाणून घ्या काय झालेत बदल…
ITR FORM – देशातील करदाते यांच्यासाठी महत्वाची बातमी असून जर ITR भरतताना फॉर्ममधील बदलाची माहितीती करदात्यांना असणे आवश्यक आहे. नवीन आयटीआर फॉर्ममध्ये यावेळी आयकर विभागाने करदात्यांची सविस्तर माहिती मागवली आहे. करदात्यांचा कर सवलतीसाठीचे चुकीचे दावे संपविण्यासाठी आणि त्यांचा संभ्रम दूर करण्यासाठी ही माहिती मागविली जात आहे. यामध्ये जे बदल करण्यात आले आहेत ते खालीलप्रमाणे…
राजकीय पक्षांना निधी देणाऱ्या करदात्यांना आयकर कायद्याच्या कलम 80GGC अंतर्गत 100 टक्के करत सवलत मिळेल. नवीन फॉर्ममध्ये करदात्यांना निधीसंबंधीची माहिती, तो देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा प्रकार, ब्रेकअप आणि बँका हस्तांतरणाची माहिती द्यावी लागणार आहे. जर कोणी करदाता कलम 80DD अंतर्गत डिडक्शन क्लेम करत असेल तर त्याला डिसेबल्ड डिपेंडेंट्सची माहिती द्यावी लागेल. त्यांचे पॅन आणि आधार कार्ड द्यावे लागेल.
दरम्यान बाजारात उलाढाल करणाऱ्या करदात्यांकडून सेस आणि इतर टर्नओव्हरची माहिती मागविण्यात आली आहे. एकाच दिवशी एखादी मालमत्ता खरेदी अथवा विक्री केली असेल तर ही माहिती द्यावी लागणार आहे. तसेच आता ज्या लोकांना त्यांच्या जीवन विमा पॉलिसीमध्ये वार्षिक बोनस मिळतो, आयटीआर – 2 आणि आयटीआर – 3 मध्ये याविषयीची माहिती स्वतंत्र द्यावी लागनार आहे. करदात्यांना त्यांच्या एम्प्लॉई स्टॉक ऑप्शंस (ई-सॉप्स), इतर व्हर्च्युअल अॅसेटची वा ऑनलाईन गेमिंगद्वारे जिंकलेल्या रक्कमेची माहिती द्यावी लागणार आहे.