जळगाव : श्री संत एकनाथ महाराज दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान…

जळगाव : श्री संत एकनाथ महाराज दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान…
पांडुरंगाच्या दर्शनासाठी महाराष्ट्र राज्यासह देशातील अनेक भागातून भाविक भक्त दर्शनाला येत असतात. तसेच लाखो दिंड्या, पालखी… देखील पंढरपूरकडे प्रस्थान करत असतात. यामध्ये लाखोंच्या संख्येने वारकरी आषाढी वारीसाठी ऊन, वारा – पाऊस यांची कसलीही तमा न करता पायी हरिनामाच्या… विठ्ठलाच्या नामघोषात विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असतात…


दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला
घुमे गजर हरिनामाचा भक्तड नामात रंगला
प्रत्येकवर्षी शेवगाव तालुक्यातील जळगाव आणि परिसरातील भाविक, वारकरी यांची श्री.संत एकनाथ महाराज दिंडी वै. गुरुवर्य भीमसिंह महाराज याच्या कृपाशीर्वादाने आणि गुरुवर्य नामदेव महाराज याच्या प्रेरणेने व दिंडी चालक सुदाम केसभट महाराज (देवा) यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १ जुलै रोजी दिंडी पालखी सोहळ्याचे जळगाव येथून विठूनामाचा जयघोषात प्रस्थान झाले. यामध्ये मोठ्या संख्येने महिला, पुरुष, बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वच सहभागी झाले.

गुण दोष त्यांचे न पाहेचि डोळा, भेटे वेळोवेळा केशिराजा
ऐसा दयावंत घेत समाचार, लहान आणि थोर सांभाळितो
सर्वालागीं देतो समान दरुशन, उभा तो आपण सम पायीं
नामा म्हणे तया संताची आवडी, भेटावया कडाडी उभाची असे
विटेवरी उभा दीनांचा कैवारी…
दरम्यान हा दिंडी सोहळा १८ दिवस चालणार आहे. त्यामध्ये ठिकठिकाणी मुक्काम करण्यात येणार असून यामध्ये मुक्कामाच्या ठिकाणी कीर्तन, भजन, प्रवचन, हरिपाठ आदी. कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडणार आहेत. या दिंडी सोहळ्यासाठी आमदार मोनिका राजळे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. यावेळी हरिभक्त पारायण चंद्रकांत गरड, कृष्ण शेकटकर, गणेश बर्डे, मधुकर पठाडे, अंबादास केसभट, प्रभाकर केसभट, भास्कर मोटे, दामुअण्णा धोत्रे, आण्णा चितारे, संभाजी वैद्य, गणेश कव्हळे, गणेश केसभट, बंडू सर, परमेश्वर केसभट, शिवाजी टेलर, लक्ष्मण आप्पा, अंकुश अण्णा, विठ्ठल हिंगे, भागवत केसभट, अर्जुन जाधव, नवनाथ म्हस्के, राजेंद्र केसभट, भिगचंद भवार आदी उपस्थित होते.

तोचि पुण्य जोडी, पंढरीचे
टाळ मृदंगाची, वीणा साथ ज्याची
भक्तीृ पाहि तोची, विठ्ठलाची
तसेच भजन, तुळशीवाले, विणेकरी, चोपदार, झेंडेकरी, मृदूंगाचार्य म्हणून बाबासाहेब बर्डे, भीमाबाई बर्डे, भगवान दाभाडे, आबासाहेब जावळे, पोंढे टेलर, अर्जुन तहकिक, मुरली माळी, महादेव पाडळे, बंडू पाटील, बाळासाहेब जवंजाळ, रामराव केसभट, निवृत्ती गायकवाड, ऋषिकेश भवार, एकनाथ केसभट, माउली दिवाण, लहू केसभट हे जबाबदारी पार पडणार आहेत.
या दिंडी सोहळ्यासाठी भोजन, नाष्टा व्यवस्था हि उमाजी गरड, एकनाथ कदम, ज्ञानेश्वर तांबे, एकनाथ शेळके, नवनाथ तांबे, ज्ञानोबा शेम्बडे, भाऊसाहेब नागरगोजे, गंगाराम हवाले, अशोक भोगील, तीर्थराज केसभट, संजीवन केसभट,तात्या आप्पा घोडके, सुधाकर तहकिक, माणिक मोंढे, बाप्पा चेडे, गोपीनाथ यादव, कचरू परांडे, विनोद दूधडमाल, रामराव केसभट, तारामती केसभट, सोन्याबापू घुगे, साहेबराव घुगे, कावेरी शहाणे, साहेबराव गरड यांनी नाश्त्याची तर दुपारचे आणि रात्रीचे भोजनव्यवस्था ही बाबासाहेब बर्डे, ग्रामविकास अधिकारी दिलीप मिसाळ, महेंद्र बनकर, प्रभाकर भोसले, सुनील घोलप, ईश्वर हातमोडे, बाळू तहकिक, दत्तू तहकिक, सतीश जाधव, श्रीराम सांगळे, संतोष काकडे, गंगाधर माळी, खंडू घुगे, संभाजी व्यवहारे, बद्रीनाथ केसभट, बाळासाहेब तहकिक, सुदाम केसभट, सरस्वती शाळा (मुंगुसवडे), ज्ञानेश्वर तांबे, जालिंदर पवार, काशिनाथ निंबाळकर, विठ्ठल तहकिक, इंगोले आबा, अंगद भोगील, विशाल रीटे, भास्कर सोलाट, कल्याण कोलते, गोवर्धन पायघनमी गंगाधर जाधव, अरुण कुंभार, नागेश थिटे, राधाकिसन केसभट, कुसुम वाघमारे, लहू केसभट यांचे याकामी सहकार्य लाभले.

यावेळी दिंडी चालक सुदाम केसभट (देवा) यांनी दिंडीसाठी सहकार्य करणारे आणि अन्नदाते यांचे आभार मानले. तसेच ज्यांना सहकार्य करायचे असेल त्यांनी भगवानराव दाभाडे आणि बाबासाहेब बर्डे यांच्याकशी संपर्क साधावे असे आवाहन करण्यात आले आहे. दिंडी पंढरपूरमध्ये कॅम्प 65 एकर, भक्तिसागर पालखी स्थळ, रामबाग परिसर येथे विठुरायाच्या दर्शनाने आणि कीर्तनाने समाप्त होईल.