जिल्हा विभाजनासाठी श्रीरामपूर बंद !

श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचा मंत्र्यांना 15 ऑगस्टपर्यंतचा इशारा…
श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचा मंत्र्यांना 15 ऑगस्टपर्यंतचा इशारा…
श्रीरामपूर (प्रतिनिधी) – अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून श्रीरामपूर जिल्हा करण्यात यावा या मागणीसाठी अनेकवेळा आंदोलने करण्यात आली. गेल्या 40 वर्षांपासून जिल्हा विभाजनाची मागणी प्रलंबित आहे. 15 ऑगस्टपूर्वी अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून श्रीरामपूर जिल्हा म्हणून घोषित करावा यासाठी गेल्या 8 दिवसांपासून सरकारचे लक्ष वेधण्यासाठीउत्तर नगर जिल्ह्यात श्रीरामपूर, अकोले, संगमनेर, राहाता, कोपरगाव, नेवासे हे तालुके येतात. यात भौगोलिक मध्य हा श्रीरामपूर तालुका येतो. त्यामुळे श्रीरामपूरचे नागरिक येते जिल्हा मुख्यालयासाठी आग्रही आहेत.सुरु आहे. मात्र आज दि. १४ जुलै रोजी श्रीरामपूर शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे.त्यामुळे सर्व व्यवहार आज बंद राहणार आहेत. अहमदनगर जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या सुमारे 17412 चौ. किमी इतका आहे.
दरम्यान सोनई येथील एका कार्यक्रमात शरद पवार हे मुख्यमंत्री असताना जिल्हा विभाजनाचा उल्लेख आपल्या भाषणात केला होता. तेव्हापासूनच जिल्हा विभाजनाची मागणी केली जात आहे. तसेच संगमनेर आणि शिर्डी येथील नागरिक देखील जिल्हा मुख्यालयासाठी आग्रही आहेत. मात्र अद्याप विभाजन झालेले नाही. मध्यंतरी विभाजन होणार अशी चर्चा होती मात्र राजकारणाच्या कृघोडीमध्ये जिल्हा विभाजनाचा प्रश्न आजतागायत प्रलंबित आहे. आता मात्र 15 ऑगस्ट पूर्वी जिल्हा विभाजन केले नाही तर मंत्र्यांना तालुक्यात फिरू देणार नाही असा इशारा जिल्हा कृती समितीने दिला आहे. त्यामुळे उत्तर नगर जिल्ह्यात राजकीय वातावरण ढवळून निघू शकते. याला आत महसूलमंत्री आणि पालकमंत्री विखे हे कशाप्रकारे हाताळतात ते पाहावे लागेल.
ना. विखे यांच्या निर्णयाकडे लक्ष
उत्तर नगर जिल्ह्यात श्रीरामपूर, अकोले, संगमनेर, राहाता, कोपरगाव, नेवासे हे तालुके येतात. यात भौगोलिक मध्य हा श्रीरामपूर तालुका येतो. त्यामुळे श्रीरामपूरचे नागरिक येते जिल्हा मुख्यालयासाठी आग्रही आहेत. मात्र महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भूमिका हि महत्वाची ठरणार आहे. तसेच उत्तरेत माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि विखे यांच्यात राजकीय वैर हे कायम आहे. त्यामुळे 40 वर्षांपासून प्रलंबित जिल्हा विभाजनाचा हा प्रश्न कधी सुटणार हे महत्वाचे आहे. मात्र महसूलमंत्री विखे असल्याने त्यांचा निर्णय हा अंतिम असणार आहे.