राज्य सरकारकडून ‘वारकरी महामंडळ’ची स्थापना; वारकऱ्यांना पेन्शन मिळणार

राज्य सरकारकडून ‘वारकरी महामंडळ’ची स्थापना; वारकऱ्यांना पेन्शन मिळणार
mukhyamantri varkari mahamandal – राज्य सरकारकांकडून राज्यात वारकऱ्यांसाठी स्वतंत्र वारकरी महामंडळाची स्थापना करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. तीर्थक्षेत्रांचा विकास, वारकऱ्यांना पेन्शन, कीर्तनकार, वारकऱ्यांना अन्न, सुरक्षा, वैद्यकीय मदत, विमाकवच, पायाभूत सुविधा इत्यादी सोयी-सुविधा पुरवण्याकरिता व कल्याणकारी योजना राबवण्याकरिता “मुख्यमंत्री वारकरी महामंडळ” कार्य करणार आहे. त्यासाठी स्वतंत्र निधी महामंडळाला दिला जाणार आहे.
महाराष्ट्र राज्यातील कीर्तनकार व वारकऱ्यांना सोयी सुविधा पुरवण्याकरिता “मुख्यमंत्री वारकरी महामंडळ” स्थापन करण्याचा मोठा निर्णय शासनाने घेतला आहे. सामाजिक न्याय विभागाचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. या महामंडळाचे मुख्यालय हे पंढरपूर येथे करण्यात येणार आहे. महामंडळामार्फत महिन्याची पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना वृद्धापकाळामध्ये वारकरी पेन्शन योजना देण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या दिनांक 11 जुलै 2024 रोजी झालेला बैठकीत “मुख्यमंत्री वारकरी महामंडळ” स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महामंडळाच्या नियोजित विविध योजना?
परंपरेने महिन्याची पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना वृद्धापकाळामध्ये वारकरी पेन्शन योजना,
वारकरी संप्रदयाच्या विविध प्रश्न सोडवणे, पालखी मार्गाची सुधारणा करणे, स्वच्छता, आरोग्य, निवारा, सुविधांसाठी आर्थिक तरतूद करणे, वारकऱ्यांना सुरक्षा, विमा कवच, वारकरी भजनी मंडळाला भजन-कीर्तन साहित्याकरिता अनुदान, मानधन सन्मान योजना, दिंड्यांना दरवर्षी सानुग्रह अनुदान, पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना पेन्शन योजना सुरु करणे.