अंगणवाडी मदतनीसांची पद भरणार : मंत्री तटकरे

अंगणवाडी मदतनीसांची पद भरणार : मंत्री तटकरे
राज्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राज्यातील अंगणवाडी मदतनीसांची 14 हजार 690 रिक्त पदं ही 31 ऑगस्ट 2024 अखेरपर्यंत भरण्याच्या सूचना सर्व जिल्हा आणि प्रकल्पस्तरावर देण्यात आल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
तसेच याबाबतची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल. इच्छुक महिलांनी अर्ज करावा, असं आवाहनही शासनाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक बेरोजगार आणि पात्र महिलांना आता अर्ज करण्यात येईल. त्यामुळे शासन स्तरावरून जाहिरात कधी सुटणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.