टोपे यांच्यामुळे काळे यांचा विजय : खा. पवार

टोपे यांच्यामुळे काळे यांचा विजय : खा. पवार
जालन्याचे खा. कल्याणराव काळे पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीत विजयी झाले. सामान्यांचे प्रश्न ते नक्की सोडवतील. मला माहित नव्हतं की इथे कोणी उभं राहावं यासंबंधीची चर्चा झाली. आजच मला कळलं या ठिकाणी लोकांचा आग्रह हा सुरुवातीला आ. राजेश टोपे यांच्या बद्दल होता. राजेश टोपे यांनी चातुर्य दाखवलं आणि कल्याणरावांच्या गळ्यामध्ये माळ घातली. महाराष्ट्राचे एकंदरीत चित्र बदलायचा निर्धार आम्ही सगळ्यांनी बसून केलेला होता. त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष होता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना होती आणि छोटे-मोठे इतरही पक्ष होते. आम्ही हा निकाल घेतलेला होता की मागची जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये हवं तसं यश आपल्याला मिळाले नाही आणि हे कुठेतरी दुरुस्त केले पाहिजे. म्हणून जनमत तयार करण्याच्या संबंधीचं काम निवडणुकीच्या आधीपासून आम्ही सर्वांनी केलं. महत्त्वाच्या ठिकाणी जाहीर सभा घेतल्या आणि लोकांना हे पटवून दिलं की देश चुकीच्या रस्त्याने नेण्याचं काम आजच्या राज्यकर्त्यांकडून होत आहे आणि याच्यातून सुटका करायची असेल, सावरायचं असेल त्यामुळे आम्ही लोकांनी एकत्रित आघाडी तयार केली त्या आघाडीच्या पाठीशी लोकांनी उभं राहिला पाहिजे. मला आनंद आहे की या आघाडीच्या निमित्ताने आम्ही लोकांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जिथे भूमिका मांडणे शक्य आहे त्या त्या ठिकाणी प्रयत्नांची पराकष्ट केली आणि जवळपास ३१ जागा महाराष्ट्रातून विजयी केल्या, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खा. शरद पावर यांनी म्हटले आहे.
तसेच निवडणूक आघाडी करून आपण लढवतो त्या आघाडीतील सर्व घटक प्रामाणिकपणाने कष्ट करतातच असं नाही. आम्ही ठरवलं होतं की उमेदवार कोणीही असो आघाडीतल्या प्रत्येक घटकांनी प्रयत्नाची पराकाष्टा केली आणि जास्तीत जास्त लोक निवडून आणून महाराष्ट्राचे स्थान देशाच्या संसदेत प्रस्थापित करण्याची मोलाची कामगिरी तुम्ही लोकांनी केली. आज ज्यांच्या हाती देशाचे नेतृत्व आहे त्या सगळ्यांची भूमिका संसदीय लोकशाहीला संकटात आणणारी आहे. एक आकस असावा कोणाच्याप्रती मग तो आकस व्यक्तींबद्दल असो, विचारांच्या संबंधित असतो. आज देशाच्या प्रधानमंत्री यांना एक प्रकारचा आकस आहे तो आकस कोणाच्या बद्दल आहे? काँग्रेस विचारांच्या बद्दलचा आहे. तो आकस जवाहरलाल नेहरू यांच्यासारख्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नेतृत्वाबद्दलचा आहे. या लोकांसंबंधी चुकीची भाषण केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. इथे पण अडकलं आहे एक प्रकारचा हा संघर्षाचा आणि आव्हानाचा काळ होता. मला आनंद आहे की महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटकाचा सहकारी आणि कार्यकर्ता या सगळ्यांनी एकजुटीने जाण्याचा निर्णय केला. आणि महाराष्ट्राच्या जनतेचे आम्ही आभार मानतो की त्यांनी जागृती केली आणि हा चुकीचा विचार देशात प्रस्तुत करण्याचे काम ज्या शक्ती आहेत त्यांना त्यांची योग्य जागा दाखवण्याचे ऐतिहासिक काम जनमताने केले असे पवार यांनी टीका करत पवार यांनी महाविकास आघाडी यापुढेही एकत्रच लढेल असे संकेत यानिमित्ताने दिले.
दरम्यान इथून पुढचा काळ हा अत्यंत महत्त्वाचा आहे. तो दोन पद्धतीने आहे एक तर कल्याणराव खासदार असतील, लंके खासदार असतील, आम्ही लोक राज्यसभेत असु. आम्हा लोकांची जबाबदारी महाराष्ट्राच्या हिताची जपणूक करणे ही आहे याच्यात काही कारण नाही. कालपासून ७० दिवसांमध्ये या राज्यामध्ये आचारसंहिता येणार आहे. त्यानंतर सर्व चित्र बदलणार आहे. आपल्याला ते चित्र बदलण्यामध्ये महत्त्वाची कामगिरी करायची आहे आणि ती कामगिरी दुसरी तिसरी कुठलीही नाही तर महाराष्ट्राचे राज्य हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा पक्ष असेल या सगळ्यांनी एकत्र येऊन सबंध महाराष्ट्राची सत्ता हातामध्ये घेणं आणि महाराष्ट्र योग्य रस्त्याला जाईल कसा? चुकीच्या लोकांच्या हातामध्ये महाराष्ट्राची जी सत्ता आहे ती सत्ता बाजूला काढून घेणं आणि जनमानसांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे हे काम तुम्हाला आणि मला करायचा आहे.
सामूहिक नेतृत्वात निवडणूक होतील : पवार
मी तुम्हाला या आघाडीचा एक सहकारी म्हणून खात्रीने एक गोष्ट सांगू इच्छितो आम्ही तीन पक्षाचे लोक असतील आम्हाला साथ देणारे डावे पक्ष किंवा अन्य सहकारी असतील त्या सर्वांना बरोबर घेऊन त्या सर्वांचे आत्मविश्वास वाढेल याची काळजी घेऊ आणि सामूहिक नेतृत्वाच्या माध्यमातून महाराष्ट्राचा चेहरा बदलण्यासाठी आम्ही काळजी घेऊ हा विश्वास या ठिकाणी आपल्याला देतो आणि या कामाला तुमच्या सगळ्यांची साथ मिळेल एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो, आणि यापुढेही प्रत्येक निवडणूक हि सामूहिक नेतृत्वत होईल असे पवार यांनी म्हटले.