Bhidewada : भिडेवाडा होणार राष्ट्रीय स्मारक : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

0
ajit pawar

Bhidewada : भिडेवाडा होणार राष्ट्रीय स्मारक : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

Ajit Pawar – महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली भिडेवाडा (bhidewada) येथील पहिली मुलींची शाळा येथे राष्ट्रीय स्मारक उभारण्याच्या दृष्टीने आवश्यक ती प्रक्रिया करुन गतीने निविदा प्रक्रिया तातडीने राबवावी असे निर्देश उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी संबंधितांना दिले.

विधानभवन पुणे येथे झालेल्या या बैठकीस अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, मनपाचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे, मुख्य अभियंता बांधकाम युवराज देशमुख आदी उपस्थित होते.

तसेच हे स्मारक पार्किंग तसेच तळमजला अधिक तीन असे चार मजल्यांचे करण्याचा बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. यात तळ मजल्यावर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा पुतळा, त्यांचा जीवनपट दर्शविणारे म्युरल्स किंवा चित्रमय व्यवस्था, वरील मजल्यावर त्यांच्या जीवनातील प्रसंग, कार्याची माहिती स्क्रीनवर दृकश्राव्य स्वरुपात दर्शविण्याची यंत्रणा तसेच त्यांचे लेखन साहित्य त्याशिवाय वरील मजल्यावर मुली, महिलांच्या कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण संस्था अशी व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मंत्री ना. छगन भुजबळ यांनी दिले. जुलै अखेरीस या कामाचे भूमिपूजन करायचे असल्याने स्मारकाचे अंदाजपत्रक तयार करुन निविदा प्रक्रिया राबविण्याच्या दृष्टीने गतीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान फुलेवाडा येथील महात्मा फुले यांच्या स्मारकाच्या विस्ताराचाही आढावाही या बैठकीत घेण्यात आला. गंजपेठ येथील महात्मा फुले वाडा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या स्मारकांच्या विस्तारासाठी आगामी अर्थसंकल्पात २०० कोटींची तरतुद करणार असल्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी यावेळी सांगितले. भूसंपादन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय पुणे आणि पुणे मनपाने या दोन्ही स्मारकांचा विस्तार करण्यासाठी आणि या वास्तूंसाठी जोड रस्ता विकसित करण्यासाठी भूसंपादनाची कार्यवाही लवकरात लवकर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Copyright © 2024 All rights reserved Shyadri Express | CoverNews by AF themes.