अण्णासाहेब पाटील महामंडळाचा १ लाख मराठा उद्योजकांना लाभ

अण्णासाहेब पाटील महामंडळाचा १ लाख मराठा उद्योजकांना लाभ
महामंडळाच्या वतीने १,००,०१४ लाभार्थ्यांना ८३२० कोटी रुपये कर्ज मंजूर झाले आहे. त्यापैकी ९०,५८३ लाभार्थ्यांना व्याज परतावा सुरू झाला असून ८१०.७८ कोटी इतकी रक्कम व्याज परतावा देण्यात आली आहे.
दरम्यान राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी याबाबत सरकारचे आभार मानले. सरकारच्या वतीने त्यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दादा भुसे, चंद्रकांत पाटील उपस्थित होते.