पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुसाळेने कास्य पदक मिळवत, ७२ वर्षांनी रचला इतिहास !

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुसाळेने कास्य पदक मिळवत, ७२ वर्षांनी रचला इतिहास !
पॅरिस येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत महाराच्या स्वप्नील कुसाळे याने ५० मीटर रायफल थ्री पोजिशन प्रकारामध्ये कास्य पदक पटकावले आहे. तब्बल ७२ वर्षानंतर हा इतिहास त्याने राजचाला असून महाराष्ट्रासह देशात मनाचा तुरा रोवला आहे. त्याची हि सर्वोत्तम कामगिरी आहे.
दरम्यान कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेने पॅरिस येथे सुरु असणा-या ऑलिम्पिक स्पर्धेत ५० मीटर रायफल थ्री पोजिशन प्रकारात कांस्य पदक पटकावत गौरवास्पद कामगिरी केली आहे. स्वप्नील कुसाळे याने भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. १९५२ साली हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये पै. खाशाबा जाधव यांनी वैयक्तिक पदक जिंकल्यानंतर आज तब्बल ७२ वर्षांनी नेमबाज स्वप्नील कुसाळे याने पुन्हा एकदा वैयक्तिक पदक पटकावत इतिहास रचला आहे.
महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी ही अभिमानाची बाब असून स्वप्नील कुसाळे याच्यासह त्याचे प्रशिक्षक व कुटुंबिय या सर्वांचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.