JAYAKWADI DAM – जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात वाढ!

JAYAKWADI DAM - जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात वाढ!
JAYAKWADI DAM – राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. काही ठिकाणी धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत तर नद्यांना पूर आला आहे. तसेच अनेक शहरांत पाणी शिरले आहे. त्यामुळे अनेकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, सांगली, सोलापूर, अहमदनगर आदी ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे त्यामुळे पाण्याची आवक धरणांत होत आहे. नाशिकमधील नांदूर मधमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरी नदी पात्रात 36 हजार 731 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुजले (JAYAKWAD DAM) जायकवाडी धरणात पाणीसाठा वाढणार आहे.
दरम्यान पैठण येथील जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरूच असल्याने दिवसेंदिवस या जलसाठ्यात आता वाढ होत आहे. सद्यस्थितीला या धरणाचा जलसाठा हा 10.35 टक्क्यावर पोहोचला असून 4 हजार 17 क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू असल्याने धरणाची पाणी पातळी 1 हजार 499.०३ फूट इतकी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच यावर्षी धरण पुन्हा पूर्ण क्षमतेने भरणार असेच दिसतेय.