लाडकी बहीण योजनेनंतर सरकारकडून आता लाडकी मोलकरीण योजना ?

राज्यात तब्बल 10 ते 12 लाख घरगुती कामगार- मोलकरणींची संख्या असल्याची माहिती सरकारच्याच माध्यमातून देण्यात येत आहे. तसेच या योजनेचा लाभ हा नोंदणीकृत कामगार मोलकरणींना मिळणार आहे.
Maharashtra Government 2024 : राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. मात्र आता असंघटित क्षेत्रातील मोलकरणींसाठी देखील सरकार लवकरच एक गृहोपयोगी साहित्य वाटपासंदर्भातील योजनेवर काम करत आहे. यासंदर्भात एक वृत्तपत्राने माहिती दिली आहे. राज्यात तब्बल 10 ते 12 लाख घरगुती कामगार- मोलकरणींची संख्या असल्याची माहिती सरकारच्याच माध्यमातून देण्यात येत आहे. तसेच या योजनेचा लाभ हा नोंदणीकृत कामगार मोलकरणींना मिळणार आहे.
दरम्यान राज्य सरकारकडून नोंदणीकृत बांधकाम कामगारांना ज्याप्रकारे साहित्य देण्यात येत होते त्याच धर्तीवर सरकारची मोलकर्णींसाठी हि योजना असणार आहे. राज्य सरकारच्या या योजनेंतर्गत स्वयंपाक घरातील कुकरसह 21 भांड्यांचा सुमारे 10 हजार रुपये किमतीचा संच घरगुती कामगार महिलांना देण्याची तरतूद केली जाणार आहे. मोलकरीण म्हणून अधिकृत नोंदणी करण्यासाठी महिलांची आता धावपळ सुरू झाली असल्याचे चित्र सद्य राज्यात दिसत आहे.
तसेच संबंधित अधिकाऱ्याने याबाबत एक वृत्तपत्राला माहिती दिली आहे कि, बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठीची भोजन योजना आणि कामावरील साहित्य संचवाटपाच्या धर्तीवरच नोंदणीकृत घरेलू कामगार, मोलकरणींसाठी 10 हजार रुपये किमतीची भांडी-कुंडी, कुकर आदी साहित्याचा संच देण्यात येणार आहे. सध्या राज्यात सुमारे 12 ते 13 लाख घरेलू कामगार असून, त्यांत 99 टक्के महिला आहेत. मात्र त्यात नोंदणीकृत किती असा प्रश्न आहे. मात्र या योजनेची माहिती समोर येत असून नोंदणी नसलेल्या महिला देखील नोंदणीसाठी धावपळ करत आहेत.