डाळींच्या किमती कमी होणार !

डाळींच्या किमती कमी होणार !
भारतात यावर्षी डाळींची आयात केली नाही तरी देखील डाळींच्या किमती यावर्षी २०२४-२५ मध्ये कमी होतील, असे युनिट इंडिया पल्सेस अँड ग्रेन्स असोसिएशनने म्हटले आहे. डाळींच्या मार्केटकडे सरकारने लक्ष डोक्याची गरज असल्याचे देखील संघटनेने म्हटले आहे.
देशात डाळीची आयात घटण्याची शक्यता युनिट इंडिया पल्सेस अँड ग्रेन्स असोसिएशनने व्यक्त केली आहे. त्यानुसार आता देशात डाळींची आयात कमी होईल. तरीही डाळीच्या किंमती आटोक्यात येतील. ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल, असे संकेत मिळत आहेत. युनिट इंडिया पल्सेस अँड ग्रेन्स असोसिएशनने चेअरमन बिमल कोठारी यांनी याविषयीची माहिती दिली. त्यानुसार, यावर्षी भारतात डाळीची आयात 40-45 लाख टनावर येणार असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान यंदा मान्सून चांगला असल्याने डाळीच्या किंमतीत मोठी घसरण होऊ शकते. या 2.5 लाख कोटी रुपयांच्या डाळ बाजाराकडे सरकारने लक्ष देण्याची आणि विशेष योजना आखण्याची मागणी आयपीजेएने केली आहे. तर पिवळ्या वाटाण्यावर आयात शुल्क लावण्याची मागणी त्यांनी केली. तसेच डाळींच्या किमती या प्रतिकिलो १० ते २० रुपयांनी कमी झाले आहेत.