maratha reservation : एक मराठा… लाख मराठा.. घोषणा देत मराठा आंदोलकांनी पवारांची गाडी अडवली

एक मराठा... लाख मराठा.. घोषणा देत मराठा आंदोलकांनी पवारांची गाडी अडवली
Maratha reservation – राष्ट्रवादी काँग्रेसचे (sp) अध्यक्ष खा. शरद पवार यांची गाडी मराठा आंदोलकांनी अडवली. मराठा आंदोलकांकडून एक मराठा, लाख मराठा अशी घोषणाबाजी करत मराठा आरक्षणावर (Maratha reservation) आपली भूमिका जाहीर करण्याची मागणी केली. खा. पवार आज (रविवार) सोलापूर जिल्ह्यातील बार्शी दौऱ्यावर आहेत. या वेळी टेंभुर्णी कुर्डूवाडी रस्त्यावर आंदोलकांनी गाडी अडवली होती.
दरम्यान खा. शरद पवार यांची टेंभुर्णी कुर्डूवाडी रस्त्यावर आंदोलकांनी गाडी अडवली. यावेळी मराठा आंदोलकांनी आक्रमक होत आपली मराठा आरक्षणाबाबत ( (Maratha reservation) ) भूमिका स्पष्ट करण्याची मागणी पवार याना केली. सकाळी बार्शीत शरद पवार यांच्या उपस्थितीत मेळावा तसेच नव्याने निवडून आलेल्या खासदारांचा सत्कार होणार आहे. त्यानंतर दुपारी 4 पर्यंत पवार हे बार्शीत आहेत. तर संध्याकाळी सोलापूर शहरातील लिमयेवाडी येथे भटके, विमुक्त, ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आला. त्याला ही उपस्थित राहनार आहेत.
