मराठा आंदोलन, आरक्षणा विरोधात षडयंत्र : मनोज जरांगे पाटील

मराठा आंदोलन, आरक्षणा विरोधात षडयंत्र : मनोज जरांगे पाटील
अहमदनगर (प्रतिनिधी) – 1राज्यात ओबीसी आणि मराठा असा वाद गेल्या काही दिवसांपासून लावण्याचे षडयंत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री छगन भुजबळ यांची टीम करत आहे. मराठा जमाजाने कधीच समाजात भांडणे लावली नाहीत अठरापगड जातींना घेऊन समाज पुढे जात आहे. सर्व जाती धर्मातील लोक सोबत आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय नेत्यांना आणि पुढार्यांना पुढचा प्रश्न पडला आहे. त्यांचे राजकीय भवितव्य धोक्यात आले आहे, हे सर्व समाजाने एकत्र आल्याने घडत आहे. असे ताशेरे ओढत मराठा आरक्षण हे ओबीसीमधूनच घेरण्याचा निर्धार मराठा नेते तथा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बोलून दाखवला. मराठा अरकक्षणासाठीच्या शांतता रॅलीसाठीचा हा दुसरा टप्पा आहे. अहमदनगर येथे जाहीर सभेतून बोलत होते. मराठा आरक्षण शांतता रॅलीचा हा दुसरा टप्पा आहे. उद्या नाशिक येथे शांतता रॅली पोहोचणार आहे. नगर शहरात मोट्या संख्येने मराठा समाज एकवटला होता.
दरम्यान पुन्हा एक दिवस मुंबईला चक्कर मारूनच यावे लागेल. मराठा आंदोलनात फूट पडण्याचा अनेक जण प्रयत्न करत आहेत. मानापानासाठी भुकेलेले एक दिवस टेम्पोत भरावे लागणार आहेत. मंत्री छगन भुजबळ, आमदार प्रवीण दरेकर दरेकर आणि संघटनांच्या माध्यमातून मराठा आंदोलनाविरोधात षडयंत्र केले जात आहे. मराठा अधिकाऱ्यांच्या बढत्या तरी होऊ देत नाही. मराठा समाजाने जात वाचवायला शिकले पाहिजे. मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचे नाही. मात्र ती वेळ आली, तर मागे हटणार देखील नाही, असा निर्वाणीचा इशारा देखील जरांगे पाटील यांनी दिला आहे.
… तर शंभर टक्के मतदान करा : जरांगे पाटील
मराठा समाजाला आरक्षण पाहिजे, पण मराठा समाजाला आरक्षण दिल नाही तर मराठ्यांना राजकारणात आल्याशिवाय पर्याय नाही. दरेकरांच्या घरी जी बैठक झाली त्याची डिटेल माहिती मला मिळणार आहे. आता मराठ्यांची कसोटी लागली आहे. 29 ऑगस्टला राज्यातील मराठा समाजाची अंतरवली येथे बैठक होणार आहे. त्यात जे ठरेल त्याच्या मागे ठामपणे उभे राहा. बैठकीत ठरले उमेदवार पाडायचे तर सर्वांनी शंभर टक्के मराठा समाजाने मतदान करा. निवडणूक लढायचे जरी ठरले तरी जो उमेदवार दिला जाईल त्याला देखील १०० टक्के मतदान करा. या राजकारण्यांना त्यांची जागा समाजाने दाखवली आहे. असे देखील मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
निवडणुकीत तीर्थक्षेत्र दर्शनाचा डाव !
राजकारण आपल्याला करायचे नाही, समाजाला न्याय द्यायचा आहे. उमेदवार पाहू नका समाजाला न्याय देणाऱ्याला मोठं करा. समाजासाठी लढणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहा. निवडणुकांच्या वेळी मराठा समाजाच्या एकाही व्यक्तींने तीर्थक्षेत्राला जायचे नाही. निवडणुकीच्यावेळी मराठा समाजाला तीर्थक्षेत्राला नेण्याचा त्यांचा डाव आहे. काही धोका केला तर त्यांचे 113 आमदार येणारच नाहीत. निवडून देण्यापेक्षा पाडा पाडी खूप सोपी आहे. आता मराठ्यांनी घरा बसून उपयोग नाही, मराठा समाजातील गोरगरीब मुलांचे भविष्य आपल्या हातात आहे. त्यामुळे पुढच्या पिढीला जिवंत ठेवीचे असेल तर संघर्ष हा अटळ आहे. राजकारण्यांचे डाव ओळख आणि भविष्यात समाजासाठी, आरक्षणासाठी घराच्या बाहेर पडा, असा सल्ला देखील मनोज जरांगे यांनी या जाहीर सभेतून दिला.