mahant ramgiri maharaj :महंत रामगिरी महाराजांचे वादग्रस्त वक्तव्य; राज्यात ठिकठिकाणी तणाव !

mahant ramgiri maharaj :महंत रामगिरी महाराजांचे वादग्रस्त वक्तव्य; राज्यात ठिकठिकाणी तणाव !
संतमंडळींच्या केसालाही धक्का लागणार नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
अहमदनगर – सरळ बेटाचे महंत रामगिरी महाराज (mahant ramgiri maharaj) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. महंत रामगिरी महाराज यांच्या विरोधात वैजापूर, येवल्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र महंत रामगिरी महाराज (mahant ramgiri maharaj) यांच्या कीर्तन सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संतांच्या केसालाही धक्का लागणार नाही असे म्हटले आहे. तसेच महाराजांना सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. महाराज देखील आपण काहीही चुकीचे बोललो नाही, आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, राज्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर महंत रामगिरी महाराज यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “बांगलादेशात जो प्रकार घडला, आज कोट्यवधी हिंदूंवर अत्याचार सुरु आहे. आमच्याकडे एक बातमी तर अशी आली की, बांगलादेशात एका महिलेवर तब्बल 30 जणांनी बलात्कार केला. कोटी-दीड कोटी लोक भारताच्या सीमेवर उभे आहेत की, आम्हाला भारतात आश्रय द्या. हिंदूंनी सुद्धा मजबूत राहायला हवे. बांगलादेशात जे घडले ते उद्या आपल्या इथे घडायला नको. अन्याय करणारा जसा अपराधी असतो तसा सहन करणारा देखील अपराधी असतो. त्यामुळे आपण अन्यायाला प्रतिकार केला पाहिजे”, असे महंत रामगिरी महाराज यांनी म्हटले आहे.
नोटीस येईल तेव्हा पाहू
“आपला धर्म आणि संस्कृती शांततेच्या मार्गाने चालले आहेत. पण कुणी शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला तर अशावेळेला आपण सुद्धा प्रत्युत्तर देण्याची तयारी ठेवावी, या दृष्टीकोनातून आम्ही ते वक्तव्य केले. हिंदूंनी मजबूत आणि संघटित राहावे. असंघटितपणामुळे आजपर्यंत फायदा घेतला गेला आहे. गुन्हा दाखल झाला असेल, नोटीस येईल तेव्हा बघू”, असे महंत रामगिरी महाराज यांनी म्हटले आहे.
रामगिरी महाराज यांनी आपल्या एका प्रवचनादरम्यावन पैगंबरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने काही ठिकाणी तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर येथे मोठा जमाव रस्त्यावर उतरून रामगिरी महाराज यांच्याविरोधात आक्रमक झालेला पाहायला मिळाला. त्यामुळे तणावाचे वातावरण होते.
संतांच्या केसालाही डाक्का लागणार नाही
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रामगिरी महाराज नाशिकमध्ये कीर्तनाच्या कार्यक्रमात इकाच मंचावर पाहायला मिळाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले कि, संतमंडळींच्या केसालाही धक्का लागणार नाही.
याप्रसंगी भाजपचे नेते गिरीश महाजन, माजी खासदार सुजय विखे पाटील देखील मंचावर उपस्थित होते. शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे, सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे हे देखील यावेळी हजर होते.