विठ्ठलाच्या टोकन दर्शन मंडप – स्कायवॉकला सरकारची मंजुरी

0
vitthal rukhmini

दर्शन मंडप आणि स्कायवॉक उभा करायला राज्य सरकारच्या उच्च अधिकार समितीने मान्यता दिली आहे.

पंढरपूर – पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्यासह देशातील वारकरी, भाविक भक्त मोठा संख्येने येत असतात. त्यामुळे गर्दी आणि दर्शनरांगेत ताटकळत उभे राहावे लागत असल्याने काहीतरी मार्ग काढण्यात यावा अशी मागणी अनेक वर्षांपासून होत होती. त्यानुसार दर्शन मंडप स्कायवॉकची संकल्पना समोर आली. त्यानुसार हा स्कायवॉक तयार करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. दर्शन मंडप आणि स्कायवॉक उभा करायला राज्य सरकारच्या उच्च अधिकार समितीने मान्यता दिली आहे. त्यासाठीचा 110 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून त्याला आता मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे काहीसा दिलासा भाविकांना आणि देवस्थान समितीला मिळणार आहे.

दरम्यान या आराखड्यातून दर्शन मंडप स्कायवॉक तयार करून टोकन पद्धतीचे दर्शन सुरू केले जाणार आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने शासनाकडे 129 कोटी रुपयांचा आराखडा सादर केला होता. यापैकी आता 110 कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे दर्शन मंडप आणि स्कायवॉक उभा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे लाखो भाविकांना निश्चितच दिलासा मिळणार आहे.

तसेच येथील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी यासाठी सरकारकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार नवीन दर्शन मंडप पंढरपुरात उभारण्यात येणार आहे. तसेच तीन महिन्यानंतर होणाऱ्या कार्तिकी यात्रेत प्रायोगिक तत्त्वावर टोकन दर्शनव्यवस्था सुरु करण्यात येईल. त्यामुळे येणाऱ्या कार्तिकीवारीत दर्शनासाठी वारकऱ्यांना, भाविक भक्तांना ताटकळत रहावे लागणार नाही.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Copyright © 2024 All rights reserved Shyadri Express | CoverNews by AF themes.