Bigg Boss Marathi : झापून झुपक… सुरज चव्हाण बिगबॉस मराठीचा कॅप्टन !

झापून झुपक... सुरज चव्हाण बिगबॉस मराठीचा कॅप्टन !
bigg boss marathi : बिग बॉस मराठीच्या नवीन प्रोमो रिलीझ करण्यात आला असून यामध्ये कॅप्टन्सी कार्याची झलक दिसून येत आहे. या नवीन प्रोमोमध्ये बिग बॉस मराठीच्या घरातील नवीन कॅप्टन होण्याचा मान सध्या मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असलेला सूरज चव्हाणला मिळाला आहे. कॅप्टन्सी कार्यात सूरज चव्हाणने झापुक झुपूक गेम करत बाजी मारली आणि तो आता बिग बॉस मराठीच्या घरातील नवीन कॅप्टन झाला आहे. यानंतर घरातील सदस्यांनी त्याचं अभिनंदन करत कौतुक केले आहे.
नवीन प्रोमोनुसार, झापूक झूपूकचे ब्रँड अॅम्बेसेडर, गोलिगत आहे ज्यांचं जिगर, सर्वात आवडते पब्लिक फिगर असे सूरजभाऊ चव्हाण झाले आहेत कॅप्टन. यानंतर बिग बॉसच्या घरातील सदस्य ‘हमारा कॅप्टन कैसा हो, सूरज भाऊ जैसा हो’, अशा घोषणा देताना दिसत आहेत. मागील भागामध्ये जान्हवी आणि सुरज यांच्यामध्ये कोण नवीन कप्तान होणार यासाठी चर्चा होत होत्या मात्र टीम बी ने सूरजला पसंती दिली आहे. त्यामुळे या पुढील आठवड्यात सुरज कॅप्टन्सी कशी निभावतो आणि त्याला कोण कशाप्रकारे विरोध आणि सहकार्य करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.