Teachers Day : राज्यातील १०९ शिक्षकांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार !

Teachers Day : राज्यातील १०९ शिक्षकांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार !
Teachers Day : शिक्षक दिनी राज्यभरातील शाळात शिकवणाऱ्या १०९ शिक्षकांना सन्मानित करत आहोत. शिक्षकांचे आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व असून माणसाला घडवण्यात त्यांच्या आई वडिलांएवढाच वाटा असतो. त्यामुळेच आज शिक्षकांना सन्मानित करताना आनंद होत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सोहळा आज दि. ५ जून रोजी मुंबईतील एनसीपीए सभागृहात पार पडला. यावेळी राज्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
दरम्यान राज्यातील ३१०५ शिक्षकांना सेवेत कायम करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. २००५ पूर्वी लागलेल्या शिक्षकांना जुन्या पेन्शन योजनेचे लाभ मिळवून देण्याबाबत चर्चा झाली असून त्याबद्दलही शासन सकारात्मक आहे. शिक्षकांवरील अन्य जबाबदाऱ्यांचा भार कमी केला जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले. तसेच शालेय शिक्षण विभागाला चांगला मंत्री मिळाला असल्याने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, माझी शाळा, माझी परसबाग, स्वच्छता मॉनिटर असे अनेक उपक्रम यशस्वीरित्या राबवता येणे शक्य झाले आहे. या सर्व उपक्रमांचा लाभ राज्यातील विद्यार्थ्यांना होईल अशी अपेक्षा देखील श्री. शिंदे यांनी व्यक्त केली.

यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव आय.ए.कुंदन, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे संभाजीराव थोरात उपस्थित होते.