राहता पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे मुंडे यांच्या हस्ते उदघाटन !

राहता पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे मुंडे यांच्या हस्ते उदघाटन !
RAHATA – राहाता पंचायत समितीच्या नविन इमारतीचे उद्घाटन माजी मंत्री तथा आमदार पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. विशेष म्हणजे ग्रामविकास मंत्री असताना या कार्यालयाच्या कामाला त्यांनीच निधीची उपलब्धता करून दिली होती. अशी माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
दरम्यान नव्याने विकसित झालेली इमारत आज सर्व सुविधांनी परिपूर्ण झाली असून या इमारतीची पाहणी विखे आणि मान्यवरांनी केली. दरम्यान बचत गटातील महिलांना पिठाच्या गिरणीचे वाटप यावेळी करण्यात आले. तसेच अनुदानाच्या धनादेशाचे वितरण देखील करण्यात आले.
याप्रसंगी कोविड काळात कर्तव्य बजावताना निधन झालेले जळगाव ग्रामपंचायतचे कर्मचारी स्व. विजयजी साळुंके यांच्या पत्नी श्रीमती अर्चनाताई साळुंके यांना 50 लक्ष रुपये मदतीचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.
याप्रसंगी माजी खासदार डाॅ. सुजय विखे पाटील, आमदार आशुतोष काळे, जिल्हा सहकारी बॅंकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालीनी विखे पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.