महाराष्ट्र विधानसभेसाठी राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्या सभा होणार, भाजप नेत्यांचे मतदारसंघ निशाण्यावर !

महाराष्ट्र विधानसभेसाठी राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्या सभा होणार, भाजप नेत्यांचे मतदारसंघ निशाण्यावर !
मुंबई – महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्षांकडून सभा, बैठका, रॅली यामार्फत लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपने राष्ट्रीय नेत्यांच्या सभा घेणार आहे. तसेच भाजप नेते अमित शहा यांनी प्लॅन बी ऐकल्याचे म्हटले जात आहे. तसेच महाराष्ट्र काँग्रेस काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या सभा घेणार आहे. तसेच अन्य बड्या नेत्यांना देखील निवडणूक प्रचारात उतरवणार असल्याचे म्हटले जात आहे. लोकसभेतील यशानंतर महाराष्ट्र काँग्रेसने कंबर कसली असून भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या मतदार संघातच या सभा घेण्यात असल्याचे म्हटले जात आहे. तसेच शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट देखील तयारीला लागला आहे.
दरम्यान यावेळच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रात विक्रमी सभा होणार आहेत. स्व:त राहुल गांधी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी येण्यास उत्सुक आहेत. तुम्ही बोलवाल तेथे मी सभेला येईल, असे राहुल गांधी यांनी प्रदेश नेतृत्वाला नुकत्याच झालेल्या सांगली दौऱ्यानिमित्य सांगितले आहे. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसकडून पूर्व तयारी केली जात आहे. काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रात जवळपास 15 सभा तर काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांच्या जवळपास 10 सभा वेगवेगळ्या जिल्ह्यात होणार आहेत. तसे नियोजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीकडून केले जात आहे.
भाजपा नेत्यांच्या मतदारसंघात होणार सभा
महाराष्ट्र काँग्रेस राहुल गांधी यांच्या सभा या भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन,चंद्रकांत पाटील, तसेच आशिष शेलार यासारख्या भाजपाच्या प्रमुख नेत्यांच्या मतदारसंघांना केंद्रस्थानी ठेवून गांधी यांच्या सभांचे नियोजन करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.