… मागच्या नाही तर पुढच्या दराने संधी द्या : आ. राम शिंदे

मागच्या नाही तर पुढच्या दराने संधी द्या : आ. राम शिंदे
जामखेड – येत्या विधानसभा निवडणुकीत मागच्या दाराने नको मला पुढच्या दाराने एंट्री द्या, लाडकी बहिणीला आता १५०० रुपयाचा पगार ३००० केल्याशिवाय मी थांबणार नाही” महायुती सरकारच्या काळात रेशन दुकानावर मोफत धान्य, महिलांना वर्षात तीन मोफत सिलेंडर, आनंदाचा शिधा देण्याचे काम या लाडक्या सरकारने केले आहे, असे विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांनी म्हटले आहे.
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे मान नात्याचा भाऊ बहिणींचा रक्षाबंधन मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेच्या पहिल्या व दुसरा हप्ता जमा झाल्याबद्दल लाडक्या बहिणीच्या रक्षाबंधनाच्या सोहळ्यात आमदार राम शिंदे बोलत होते. आ. शिंदे पुढे बोलताना म्हणाले कि, राज्यातील महिलांना खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने न्याय देण्याची भूमिका घेतली आहे. आमचे विरोधक ही योजना बंद करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, वेगवेगळ्या अफवा पसरवत आहेत, त्यांना येणारा विधानसभा निवडणुकीत घरी बसवा.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र सुरवसे, संजविनी पाटील, सचिन सर गायवळ, भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशीद, माजी सभापती भगवान मुरूमकर, मार्केट कमिटीचे सभापती शरद कार्ले,माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, मार्केट कमिटीचे संचालक वैजिनाथ पाटील आदी उपस्थित होते.