MARATHA RESERVATION : मराठा आरक्षण पुनर्विचार याचिकेवर ११ सप्टेंबरला कोर्टात सुनावणी !

मराठा आरक्षण पुनर्विचार याचिकेवर ११ सप्टेंबरला कोर्टात सुनावणी !
MARATHA RESERVATION – राज्यातील मराठा आरक्षणाबाबत (Maratha reservation) महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मराठा आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेवर पुन्हा सुनावणी होणार आहे. पुनर्विचार याचिकेवर 11 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. याचिकेवरील अंतिम निर्णय त्याच दिवशी येण्याची शक्यता आहे. मराठा समन्वयक विनोद पाटील यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. विनोद पाटील यांच्याच वतीने सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान “11 सप्टेंबरला 1001 क्रमांकाची सुनावणी आहे. दुपारच्या वेळेस मराठा आरक्षणाच्या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. या सुनावणीत निर्णय येणं अपेक्षित आहे”, अशी आशा विनोद पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. विनोद पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार 11 सप्टेंबरला मराठा आरक्षणाच्या याचिकेवर अंतिम सुनावणी होऊन निकाल जाहीर झाला तर मराठा आरक्षणासाठीचा तो मोठा दिवस ठरणार आहे. अर्थात या प्रकरणात काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. न्यायालयाने निर्णय दिल्यास मराठा समाजाला याचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे राज्यातील मराठा समाजाचे आहे. तसेच सरकारकडून देखील यासाठी पूर्ण तयारी केली गेली असल्याचे म्हटले जात आहे.
विनोद पाटील यांनी काय म्हटलेय …
राज्याचे लक्ष लागून असलेल्या मराठा आरक्षणाच्या याचिकेवर 11 तारखेला सुनावणी होत आहे. सर्वोच्च न्यायालयात ही अंतिम सुनावणी निश्चित करण्यात आली आहे. मराठा समाज अनेक वर्षांपासून न्यायाची वाट पाहत आहे. तर समाजाला कुणबी मराठा म्हणून मान्यता मिळेल अशी अपेक्षा होती. त्यामुळे 11 तारखेला होणारी सुनावणी न्याय मिळण्याची अंतिम संधी मानली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर आता याबाबतची जबाबदारी आहे, त्याचं कारण म्हणजे सत्ता मिळवण्यासाठी त्यांनी काय काय केलं, तसेच मराठा समाजाला न्याय देण्यासाठी देखील ते प्रयत्न करतील अशी अपेक्षा आहे असे विनोद पाटील यांनी म्हटले आहे.1
1 thought on “MARATHA RESERVATION : मराठा आरक्षण पुनर्विचार याचिकेवर ११ सप्टेंबरला कोर्टात सुनावणी !”