niti ayog : मुंबई ‘जागतिक आर्थिक केंद्र’ म्हणून विकसित करण्यासाठी निती आयोगाचा अहवाल !

niti ayog : मुंबई 'जागतिक आर्थिक केंद्र' म्हणून विकसित करण्यासाठी निती आयोगाचा अहवाल !
मुंबई – मुंबई महानगर प्रदेश (MMR) ला ‘जागतिक आर्थिक केंद्र’ म्हणून विकसित करण्याबाबत निती आयोगाच्या (niti ayog) अहवालाचे काल दि. १२ सप्टेंबर रोजी सह्याद्री अतिथीगृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रकाशन करण्यात आले. तसेच मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण- एमएमआरडीए व वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांच्या एमएमआर वर्ल्ड ईकॉनॉमी हबसाठीच्या सामंजस्य करार देखोल करण्यात आला. याबाबतची महती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
दरम्यान या करारावर एमएमआरडीएचे महानगर आयुक्त विक्रमकुमार तसेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक तथा कार्यकारी अध्यक्ष प्रा.क्लॉस श्वाब यांनी स्वाक्षरी केल्या व करारांचे अदान-प्रदान केले.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण- एमएमआरडीए यांच्यातील सामंजस्य करारामुळे मुंबईचे जागतिक आर्थिक केंद्राचे स्वप्न दृष्टीपथात आले आहे. यातून आगामी काळात मुंबईचा जीडीपी – सकल उत्पन्न दुप्पट होईल असे मत यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यक्त केले. तर निती आयोगाने (niti ayog) महाराष्ट्राच्या एक लाख कोटी डॉलर्स – वन ट्रिलीयन डॉलर्स ईकॉनॉमीच्या दिशेने टाकलेल्या पावलांना बळ दिले आहे असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे.
Read This : MARATHA RESERVATION : मराठा आरक्षण पुनर्विचार याचिकेवर ११ सप्टेंबरला कोर्टात सुनावणी !
तर मुंबई ग्लोबल फिनतेक होईल …
मुंबई ही आम्हा सर्वांसाठीच जीवनवाहीनी आहे. हा एक महत्वपूर्ण क्षण आहे. मुंबई बदलली तर महाराष्ट्र आणि देशासाठीही महत्वाचा बदल होणार आहेत. आम्ही राज्याच्या विकासासाठी स्थापन केलेल्या आर्थिक सल्लागार परिषदेने राज्याच्या विकासासाठी शिफारस आणि आराखडा सादर केला आहे. या आराखड्याला बळ मिळेल अशी संकल्पना घेऊन निती आयोग पुढे आला आहे. सात बेटांवरील मुंबईचा विकास आता एमएमआर आर्थिक केंद्र होण्यासाठी सात महत्वाच्या शिफारशी निती आयोगाने केल्या आहेत. मुंबई ही भविष्यात ग्लोबल फिनटेक कॅपिटल होईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार मिलिंद देवरा, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक तथा कार्यकारी अध्यक्ष प्रा.श्वाब, त्यांच्या पत्नी हिल्डे श्र्वाब, निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.व्ही.आर.सुब्रमण्यम, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ.आय.एस.चहल, मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त विक्रमकुमार, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता तसेच उद्योग, बांधकाम तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.