AJIT PAWAR : बारामतीतून पवार यांचे निवडणूक न लढवण्याची संकेत !

AJIT PAWAR : बारामतीतून पवार यांचे निवडणूक न लढवण्याची संकेत !
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा किंवा जामखेड मतदार संघातून निवडणूक लढवणार ?
AJIT PAWAR – मी आता 65 वर्षांचा झालो आहे, न मागताही विकासकामे झाली आणि होत आहेत, तरीही बारामतीकर वेगळा विचार करतात अशी खंत व्यक्त करत, बारामतीला एकदा माझ्याशिवाय दुसरा आमदार मिळाला पाहिजे. दुसरा आमदार आला की माझी किंमत तुम्हाला कळेल असं वक्तव्य अजित पवारांनी (AJIT PAWAR) केले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री असणारे अजित पवार हे बारामतीमधून लढणार नसल्याचे संकेत खुद्द पवार यांनीच दिल्याने एकाच खळबळ बारामतीसह राज्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत उडाली आहे.
दरम्यान या आधीही अजित पवारांनी ते बारामतीमधून निवडणूक न लढण्याचे संकेत दिले होते. आताही तशाच प्रकारचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे अजित पवार भावनिक राजकारण करत असल्याची चर्चा आहे. बारामती लोकसभेतील सुनेत्रा पवारांचा पराभव हा अजित पवारांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे या वक्तव्यावरून दिसत आहे, अशी चर्चा आहे. बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी त्यांनी अशाप्रकारचे वक्तव्य केले.
… तेव्हाच माझी किंमत कळेल !
एकदा बारामतीकरांना मी सोडून आमदार मिळाला पाहिजे. मग त्यावेळी माझी 1991 ते 2024 पर्यंतच्या कामाची तुलना करा. त्यावेळी 1991 पासूनच्या माझी कामं तुम्हाला कळतील. मीही आता 65 वर्षांचा झालो. बारामतीत मी वेगळी भूमिका घेतली नाही तरीही पराभव झाला. बारामतीला माझ्याशिवाय दुसरा आमदार मिळाला पाहिजे. दुसरा आमदार आला म्हणजे तुम्हाला माझी किंमत कळेल. मी केलेली कामं तुम्हाला कळतील. अशाप्रकारचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
बारामती ऐवजी जामखेड किंवा श्रीगोंदा मतदार संघातून निवडणूक लढवणार ?
राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती ऐवजी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा किंवा कर्जत-जामखेड मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा अनेक दिवसापासून सुरु आहेत. तसे संकेतच आता त्यांनी बारामतीत कार्यकर्त्यांना दिले असल्याचे म्हटले जात आहे. मध्यंतरी आमदार रोहित पवार यांनी देखील अजित पवार हे कर्जत – जामखेड मतदार संघातून निवडणूक लढवतील असे म्हटले होते. तसेच अजित पवार यांचे पुत्र जय पवार हे श्रीगोंदा येथे येऊन गेले होते. त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांशी याविषयी चाचपणी केली असल्याची चर्चा देखील त्यावेळी केली गेली होती. मात्र आता पवार यांनी बारामती मतदार संघात निवडणूक लढवणार नसल्याचे संकेत दिले आहेत. मात्र आता त्यांनी हि राजकीय खेळी किल्ल्याचे देखील म्हटले जात आहे.