Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी अंतरवलीत जरांगे यांचे उपोषण सुरु; आ. राऊतांच्या सल्ला !

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी अंतरवलीत जरांगे यांचे उपोषण सुरु; आ. राऊतांच्या सल्ला !
Manoj J|arange : राज्यातील मराठा समजाला सरकारने आरक्षण (Maratha reservation) द्यावे या मुख्य मागणीस मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज दि. 16 सोमवारी मध्यरात्रीपासून अंतरवली सराटी येथे पुन्हा उपोषणाला सुरूवात केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे दर्शन घेऊन त्यांनी उपोषणाला सुरूवात केली. राज्यभरातून मराठा समाज आंदोलनस्थळी एकवटला आहे. मनोज जरांगे हे सहाव्यांदा उपोषणाला बसले आहेत. सरकारला आता शेवटची संधी आहे. त्यांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावे अन्यथा याचे परिणाम भोगावे लागतील असा इशाराच जरांगे पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे सरकारकडून देखील आंदोलन करू नये यासाठी प्रयत्न असणार आहेत. यावेळी महिला भगिनींनी त्यांचे औक्षण केले.
मराठा नेते, आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये मराठा, कुणबी एक आहेत, असा जीआर लवकरात लवकर काढा. तसेच हैदराबाद, सातारा, बॉम्बे गॅझेट लागू करा. आम्ही राजकारण करू नये असे वाटत असेल तर आमच्या मागण्या पूर्ण करा. तुम्ही या किंवा येऊ नका. आपण आपली प्रक्रिया राबवत असतो, कोणी या म्हणून आंदोलन नसते, समाजात फूट पाडणे हे त्यांचे कामाच आहे, मला राजकारणाकडे जायचे नाही, आमच्या व्याखेप्रमाणे अंमलबजावणी करा, तिन्ही गॅझेट लागू करा, शिंदे समितीने 24 तास काम केले पाहिजे याचा मागण्या आहेत. सरकारने गांभीर्याने घ्यावे, टोलवाटोलवी करून समाजाला फसवू नये.
देवेंद्र फडणवीस हे समाजात फूट पडत आहेत सरकारमधील त्यांचे काही सहकारी देखील विनाकारण बोलत असतात. त्यांचे वेगळे परिणाम त्यांनाच भोगावे लागतील. त्यांना फडणवीस यांनी समाज द्यावी. मी आंदोलन करतो, कोणाची वाट बघत नाही, निवडणुकीशी आम्हाला देणे घेणे नाही. राजकारणाचा एकही शब्द बोलणार नाही, आमची अंमलबजावणी करा, नंतर बोंबलू नका. सरकारने आरक्षण दिले नाही तर त्याला देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील. पुढे काही घडले तर त्याला फडणवीस आणि सरकार जबाबदार असतील असा इशाराच जरांगे पाटील यांनी दिला आहे.
जरांगे यांच्या हे… लक्षात आले नसेल…
मनोज जरांगे पाटील यांचा जो मुद्दा आहे तोच माझाही आहे. सनदशीर मार्गाने चालू आहे. आरक्षण जर मिळवायचा असेल तर विधानसभेत अधिवेशन घ्यावे लागेल. अन्यथा विधिज्ञ उभा करून न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागेल. याशिवाय मराठा आरक्षणासंदर्भात दुसरा पर्याय नाही. हाच मुद्दा जरांगे पाटलांच्या लक्षात आला नसेल. जरांगे पाटील जर म्हणले असतील अधिवेशन घ्या तर आनंदाची बाब आहे. त्यामुळे जर त्यांची माझी भूमिका ही एक झाली तर आनंदाची बाब आहे, असं भाजप पुरस्कृत अपेक्षा आमदार राजेंद्र राऊतांनी म्हटले आहे. तसेच सर्वच मराठा आमदारांनी उघड भूमिका घ्यावी, सर्वच पक्षांना मराठा समाजाचे मतदान घ्यायचे आहे, असेही राऊत म्हटले.