Dhangar Reservation : धनगर समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या, अन्यथा आंदोलन

0
kiran lahamate

Dhangar Reservation : धनगर समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या, अन्यथा आंदोलन

आमदार किरण लहामटे यांचा सरकारला इशारा; झिरवळ यांचाही सरकारला घरचा आहेर

अकोले – राज्य सरकारकडून धनगड आणि धनगर (dhangar reservation) एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काल दि. १५सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर शंभूराज देसाईंनी याबाबत माहिती दिली. आता या निर्णयाला महायुतीच्याच नेत्यांमधून विरोध होत असल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीला विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला.

यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी सरकारच्या या निर्णयाविरोधात दंड थोपटले आहेत. आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नका, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशाराच सरकारला दिला आहे. तसेच झिरवळ यांनी आपण समाजासाठी वेळ आली तर राजीनामा देऊ असेही ठणकावले आहे.

दरम्यान धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा ज्यांनी कोणी निर्णय घेतला त्यांचा मी निषेध करतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 47 जमातींना आरक्षण दिले आहे. आणि त्यात कोणाचाही समावेश होवू शकत नाही. घटनेची कोणी पायमल्ली करू नये. धनगर समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर स्वतंत्र द्या. सरकारने डोके ठिकाणावर ठेवून काम करावे. धनगर आणि आदिवासी समाजाचा काही संबध नाही. त्यांची संस्कृती स्वतंत्र आहे. सरकार असं का विचार करतंय? किंवा काही संघटनांना का वाटतंय की आदिवासी समाजात आरक्षण मिळावे. आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नका. अन्यथा उग्र स्वरूपाचे आंदोलन केल जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार डॉ. किरण लहामटे यांनी दिला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Copyright © 2024 All rights reserved Shyadri Express | CoverNews by AF themes.